माकडाला कधी पंतग उडवताना पाहिलंय का? VIDEO
हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर एका युजरने शेअर केला आहे. हा व्हिडिओ लांबून रेकॉर्ड करण्यात आला असला तरी एक माकड पतंग उडवत असल्याचे स्पष्ट दिसत आहे.
माकडांचे व्हिडिओ सोशल मीडियावर दररोज झळकत असतात. अनेकदा ते लोकांना त्रास देताना दिसतात तर कधी त्यांचे इतर मजेशीर व्हिडिओ समोर येतात. पण नुकताच एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये एक माकड छतावर बसून पतंग उडवताना दिसत आहे. हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर एका युजरने शेअर केला आहे. हा व्हिडिओ लांबून रेकॉर्ड करण्यात आला असला तरी एक माकड पतंग उडवत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. व्हिडिओमध्ये पतंग आकाशात वरच्या दिशेने उडत आहे आणि माकड पतंगाची दोरी खेचत आहे.
माकड छताच्या काठावर बसलेलं आहे. माकड त्याची दोरी ओढत आहे. पतंगाचा दोरी ओढताच पतंग त्याच्या दिशेने येताना दिसते. तर दुसरीकडे इथे बसलेली मुलं जोरजोरात ओरडत आहेत आणि एन्जॉय करत आहेत.
View this post on Instagram
माकडाने पतंगाचा सगळा धागा आपल्याकडे खेचला तेव्हा पतंगही माकडापर्यंत पोहोचले. व्हिडिओच्या शेवटी माकड पतंग पकडतो आणि पतंगाचा धागा सोडतो असे दिसत आहे. हा व्हिडिओ पोस्ट होताच सोशल मीडियावर खळबळ उडालीये.