दुचाकीच्या चाकात माकड अडकलं, व्हिडीओ व्हायरल

| Updated on: Nov 09, 2022 | 12:36 PM

एका भरधाव दुचाकीच्या पुढील चाकात एक माकड अडकले, हे माकड रस्ता ओलांडत होतं.

दुचाकीच्या चाकात माकड अडकलं, व्हिडीओ व्हायरल
monkey video
Image Credit source: Social Media
Follow us on

सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ही क्लिप उत्तर प्रदेशातील बाराबंकी मधील असल्याचं म्हटलं जातंय. एका भरधाव दुचाकीच्या पुढील चाकात एक माकड अडकले, हे माकड रस्ता ओलांडत होतं. माकड चाकात अडकताच दुचाकीस्वाराने तात्काळ मोटारसायकल थांबवली, त्यानंतर स्थानिकांनी मोठ्या प्रयत्नानंतर या माकडाला वाचवलं. या अपघातात दुचाकीस्वार आणि माकड दोघेही सुखरूप असल्याचा दावा त्यांनी केला. त्यावर लोक प्रतिक्रिया देत आहेत. काही जणांनी लिहिलं की, चालत्या बाईकच्या चाकात माकड कसं अडकलं हे समजत नाही.

रिपोर्ट्सनुसार, बाराबंकीच्या बडोसराईमध्ये ही घटना घडली आहे. दुचाकीस्वार रस्त्यावरून जात असताना रस्ता ओलांडणाऱ्या माकडाला अचानक मोटारसायकलची धडक बसली आणि ते दुचाकीच्या पुढील चाकात अडकले.

दुचाकीस्वाराने तात्काळ ब्रेक लावले, त्यानंतर आजूबाजूच्या लोक तिथे जमा झाले. त्याने काळजीपूर्वक माकडाला चाकातून बाहेर काढलं.

माकडाला बाहेर काढण्यासाठी प्रथम मोटारसायकलचे चाक उघडण्यात आले. माकडाला बाहेर काढताच तो तिथून निसटला.

सुदैवाने या घटनेत कोणीही गंभीर जखमी झाले नाही. दुचाकीस्वाराने ब्रेक लावला नसता तर मोठा अपघात होऊ शकला असता, असं स्थानिकांचं म्हणणं आहे.

काही सेकंदाच्या व्हायरल क्लिपमध्ये मोटारसायकलच्या पुढच्या चाकात एक माकड अडकलेलं दिसतंय. स्थानिक लोक माकडाला हटवण्याचा प्रयत्न करत आहेत. काही लोक दुचाकीचे पुढील चाक उघडताना दिसत आहेत.

हा व्हिडिओ सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर शेअर केला जात आहे, जो पाहून लोक हैराण झाले आहेत.

काही युझर्सनी सांगितलं की, बाईक रायडने पटकन ब्रेक दाबल्याने मोठा अपघात टळला. दुसऱ्याने सांगितले की, मोटरसायकलस्वार जास्त वेगात नव्हता हे चांगले आहे.