थंडगार वारा, बाहेर नजारा आणि विंडो सीट जवळ माकड! भन्नाट Video Viral
तुमच्याकडे माकडाशी संबंधित खूप आठवणी असतील नाही का? फिरायला गेलं की माकडाचं टोळकं दिसायचं. माकड खूप चपळ, हातात जे असेल ते हिसकावून घेणार. ते चॉकलेट असो किंवा अजून काहीही असो. लोकं तर माकड दिसलं की अगदी डोक्यावरची टोपी सुद्धा सांभाळतात. असं करत-करत माकडाला सगळेच घाबरतात. हा व्हायरल व्हिडीओ बघा यात तर माकडाने हद्द पार केलीये.
मुंबई: फिरायला जाण्याचं वेड असणाऱ्या लोकांना माकड किती स्मार्ट असतात हे चांगलंच माहित आहे. अनेक ठिकाणी फिरायला गेलं की तिथे माकडं दिसतात. ही माकडं खूप वाढीव असतात. समजा आपण त्यांना काही खायला दिलं तरी ते तितक्याच चपळाईने खातात किंवा नाही दिलं तरी ते ओढून खातात. माकडांचे असे अनेक व्हायरल व्हिडीओ आपण बघतो. आपल्याला अपेक्षा सुद्धा नसते, आपण निवांत रस्त्याने चालत असतो, माकड येतं आणि हातातल्या गोष्टी हिसकावून घेऊन जातं. तुमच्याकडेही लहानपणीच्या अशा अनेक आठवणी असतील. या व्हिडीओमधील माकड बघून तुम्हालाही त्या आठवणी आठवतील. हा व्हिडीओ खूप सुंदर आहे. या व्हिडिओमध्ये एक माकड बसच्या खिडकीत बसलंय.
पूर्ण व्हिडीओ बघा…
ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಸರ್ಕಾರದಲ್ಲಿ ಮಹಿಳೆಯರಿಗೆ ಬಸ್ ಪ್ರೀ ಅಂದಿದ್ದರ ಪರಿಣಾಮ ಹಾವೇರಿ To ಹಿರೇಕೆರೂರಿಗೆ 30 KM ಬಸ್ನಲ್ಲಿ ಪ್ರಯಾಣ ಮಾಡಿದ ಕೋತಿ. ಟಿಕೆಟ್ ತಗೋ ಅಂದ್ರೆ ನಾನೂ ಹೆಣ್ಣು ಅಂತಂತೆ..!! ಆಧಾರ್ ಕಾರ್ಡ್ ಎಲ್ಲಿ ಅಂದ್ರೆ ಮರದ ಮೇಲಿದೆ ಅಂತಂತೆ..!! ಏನೇ ಮಂಗನಿಂದ ಮಾನವ ಅಲ್ಲವೇ ?#Congress #Shakthi #freebus #gurenartes pic.twitter.com/qHyMzt1PoB
— ಒಕ್ಕಲಿಗ ( Okkaliga ) (@NanuVokkaliga) October 4, 2023
माणसाला बसायला जागा नाही
बसमध्ये माणसाला बसायला जागा मिळत नाही आणि हे माकडबुआ बघा किती आरामात बसून आहेत. या व्हिडीओ मध्ये एक माकड एकदम आरामात खिडकीत बसलंय. या बसमधील लोकं तशीच उभी आहेत, या लोकांना बसायला सुद्धा जागा नाही पण ते माकड मात्र खूप आरामात त्या खिडकीत बसून आहे. बसमध्ये खिडकीत जागा मिळाल्यावर कसा एखाद्याला आनंद होतो आणि तो खिडकी बाहेर बघतो, मजा करतो अगदी तसेच या माकडाचे हावभाव आहेत.
माकडाला मिळालीये विंडो सीट!
थंडगार वारा, बाहेर नजारा आणि माकडाला मिळालीये विंडो सीट! यापेक्षा भारी काय असू शकतं? हे सगळं मिळाल्यावर माणसाला आनंद होऊ शकतो, माणूस मजा करू शकतो मग माकड का नाही? बसमध्ये उभे असणारे लोकं या माकडाकडे बघतायत, माकड मात्र खूप मजा करतंय. तिकीट नाही काही नाही माकडाची फुल्ल मजा! माकडाच्या शेजारी लोकांना बसता येईना आणि माकडाला हाकलून सुद्धा देता येईना असा हा मजेदार व्हिडीओ बघताना तुम्हाला सुद्धा खूप हसू येईल. हा व्हिडीओ तुम्ही पुन्हा पुन्हा बघाल.