Indian Railways भारतातली सगळ्यात महागडी रेल्वे आतून कशी दिसते माहितेय का? या दाखवतो…

ही आहे आपल्या देशातली सगळ्यात महागडी रेल्वे, आपण एवढा खर्च तर करू शकत नाही पण व्हिडिओ बघून नक्कीच समाधान मानू शकतो.

Indian Railways भारतातली सगळ्यात महागडी रेल्वे आतून कशी दिसते माहितेय का? या दाखवतो...
Image Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Jan 08, 2023 | 12:32 PM

रेल्वे ही प्रवासासाठी अधिक किफायतशीर आणि आरामदायी मानली जाते. रेल्वेने प्रवास केल्याने आपला वेळ वाचतो आणि पैशांचीही बचत होते. भारताने आपले ट्रेन नेटवर्क इतके मोठे केले आहे की आता ते जगातील 4 सर्वात मोठ्या रेल्वे नेटवर्कमध्ये सामील झाले आहे. तुम्हाला देशात कुठेही जायचे असेल तर रेल्वे हा उत्तम पर्याय आहे आणि त्यात प्रवास करणे सुरक्षित आहे.

ट्रेनमध्ये प्रवास केल्याने पैशांची बचत होते त्यामुळे आपल्याला साहजिकच माहित नसेल की अशी एक रेल्वे आहे जी सगळ्यात महागडी आहे. सांगा बरं कुठली?

आम्ही तुम्हाला देशातील सर्वात महागड्या रेल्वेची ओळख करून देणार आहोत. या रेल्वेमध्ये अशी सुविधा आहे जी तुम्हाला पंचतारांकित हॉटेलमध्येही मिळणार नाही.

रेल्वेमध्ये प्रवेश करताच तुम्ही जगातील सर्वोत्तम हॉटेलमध्ये पोहोचल्याचा भास होईल.

आपण महाराजा एक्सप्रेसबद्दल बोलतोय. महाराजा एक्सप्रेस ट्रेन इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) द्वारे चालवली जाते. ही रेल्वे तिच्या नावाला शोभेल अशीच आहे. जसं तिचं नाव तशीच ती आतून दिसते.

महाराजा एक्सप्रेस ही भारतातील सर्वात महागडी ट्रेन असल्याचे म्हटले जाते. ही ट्रेन 7 दिवस चार वेगवेगळ्या मार्गांवर प्रवास करते ज्यात ‘द इंडियन पॅनोरमा’, ‘ट्रेझर्स ऑफ इंडिया’, ‘द इंडियन स्प्लेंडर’ आणि ‘द हेरिटेज ऑफ इंडिया’ या मार्गांचा समावेश आहे.

ट्रेनचे आतील दृश्य पाहून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल, ट्रेन अशी असू शकते याचा तुम्ही स्वप्नात देखील विचार करू शकत नाही.

ट्रेनच्या आत, तुम्हाला एक बैठकीची खोली दिसेल ज्यामध्ये सोफा-टेबल ठेवलेले आहेत. आतील बेडरूमची रचना अतिशय सुंदर आहे आणि त्यामध्ये टीव्हीसह आवश्यक सुविधाही उपलब्ध आहेत. दुसऱ्या बेडरूममध्ये तुम्हाला दोन बेड दिसतील. यामध्ये प्रवास करण्यासाठी तुम्हाला सुमारे 19 लाख रुपये मोजावे लागतील.

या ट्रेनमध्ये कोणत्याही विमानापेक्षा जास्त सुविधा देण्यात आल्या आहेत. याच्या दरवाज्यांना पूर्णपणे अँटिक लुक देण्यात आला आहे आणि आतील आतील रचना देखील अतिशय अनोखी दिसते. या ट्रेनमध्ये तुम्हाला पूर्णपणे शाही व्यवस्था मिळते.

काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.