पाचवीला पुजलेली गरिबी पण सोबत आई आहे ना…! जगातला सगळ्यात सुंदर व्हिडीओ
वो नाजुक सी दिखने वाली “मां” औलाद के लिए “मर्द” बन जाती है…!!!! गरिबी जर पाचवीला पुजलेली असेल तर आई काहीही करू शकते. ती कधी ढाल आहे, कधी दुर्गा आहे. डोक्यावर जर गरिबीचा डोंगर असेल आणि आई सोबत असेल तर तो डोंगर सुद्धा हलका वाटायला लागतो. हा व्हिडीओ बघा, रस्त्यावर फुगे विकताना आई आपल्या दोन गोंडस मुलींना संभाळतेय. कदाचित हा जगातला सगळ्यात सुंदर व्हिडीओ असावा.
मुंबई: सोशल मीडियावर रोज वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. कधी कुणाच्या डान्सचा व्हिडीओ असतो, कधी गाण्याचा कधी कशाचा. पण काही व्हिडीओ खूप खास असतात. हे व्हिडीओ लोकांना इतके आवडतात की ते शेअर सुद्धा तितक्याच प्रमाणात होतात. लोकप्रिय ठरणाऱ्या व्हिडीओ मध्ये कधी प्राण्यांचे व्हिडीओ असतात तर कधी पक्ष्यांचे. आता हा व्हिडीओ एकदम हटके आहे. एका जत्रेत एक फुगे विकणारी आई असते आणि ती फुगे विकता विकता आपल्या मुलींचा फोटो काढते. हे वाचायला जितकं सुंदर आहे तितकंच हा व्हिडीओ बघायला सुद्धा खूप सुंदर आणि भावुक करणारा आहे. वो नाजुक सी दिखने वाली “मां” औलाद के लिए “मर्द” बन जाती है !!!! खरंय, आई आपल्या मुलांसाठी काहीही बनू शकते, वेळ पडल्यावर ती बाप सुद्धा होते. हा व्हिडीओ तुम्ही पुन्हा पुन्हा बघाल.
आई फुगे विकत असते
आपण जत्रेत गेलो की तिथे आपल्याला अनेक गोष्टी दिसतात. यात अगदी लहान-लहान मुलं सुद्धा बऱ्याच गोष्टी विकत असतात. इतकी गरिबी बघून आपल्याला सुद्धा वाईट वाटतं. कधी-कधी तर संपूर्ण कुटुंबच रस्त्यावर असतं. गरिबी वाईट असते हे सांगायला आपल्याला कुणाची गरज नाही. अशा कुटुंबात रस्त्यावर काम करता करताच मुलांना लहानाचं मोठं केलं जातं. आता हाच व्हिडीओ बघा. एका जत्रेत या दोन मुलींची आई फुगे विकत असते. तितक्यात ती तिच्यालहान मुलींचा मोबाईलमध्ये फोटो काढते. ती जेव्हा फोटो काढते तेव्हा त्या दोन मुली छान पोज देतायत. व्हिडीओ बघा…
व्हिडीओ
Mother, Daughters, and Digital India…. pic.twitter.com/gmukSKALUP
— Lt Col Amol Awate(Veteran),IAS🇮🇳 (@AmolAwate79) October 29, 2023
आई सोबत असल्यास सगळंच हलकं
ही आई जेव्हा मुलींचा फोटो काढत असते तेव्हा कुणीतरी हा सुंदर क्षण कॅमेऱ्यात कैद करतं. व्हिडीओत ही आई इतकी सुंदर दिसतेय की तुम्हाला काही क्षण हा जगातला सगळ्यात सुंदर व्हिडीओ असल्यासारखं वाटतं. आपल्या मुलींचा फोटो काढणारी ही आई, आपलं आवडतं काम करतेय. आपल्या मुलांचे लाड करतेय. त्यामुळे अर्थातच हा जगातला सुंदर व्हिडीओ आहे नाही का? या मुलीसुद्धा आईकडे बघून खूप छान पोज देतायत. व्हिडीओ भावुक करणारा आहे. गरिबीसारखा दुःखाचा डोंगर जरी डोक्यावर असला तरी आई सोबत असल्यास सगळंच हलकं वाटतं, हो ना? व्हिडीओ बघून तेच वाटतं.