Video: धरणाच्या सरळ भिंतीवर चढणाऱ्या, धावणाऱ्या शेळ्या, डोळ्यांवर विश्वास बसणार नाही असा व्हिडीओ

व्हिडिओमध्ये काही शेळ्या केवळ धरणाच्या सरळ भिंतीवर चढताना दिसत नाहीत, तर तुम्ही धावतानाही दिसतील. हे दृश्य खूपच थक्क करणारे आहे.

Video: धरणाच्या सरळ भिंतीवर चढणाऱ्या, धावणाऱ्या शेळ्या, डोळ्यांवर विश्वास बसणार नाही असा व्हिडीओ
धरणाच्या भिंतीवर चढणाऱ्या शेळ्या
Follow us
| Updated on: Oct 25, 2021 | 5:16 PM

प्राण्यांशी संबंधित अनेक व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत असतात. यातील काही खूप मजेदार असतात, तर काही पाहून आश्चर्यही वाटते. सध्या, शेळ्यांशी संबंधित असा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो पाहिल्यानंतर तुम्हाला तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. व्हिडिओमध्ये काही शेळ्या केवळ धरणाच्या सरळ भिंतीवर चढताना दिसत नाहीत, तर तुम्ही धावतानाही दिसतील. हे दृश्य खूपच थक्क करणारे आहे. (Mountain goats Climbing on Dam Wall in Italy video goes viral left Netizens Amazed)

या माउंटन गोट्स आहेत, ज्या धरणाच्या शेकडो फूट उंच भिंतीवर चढण्याचा प्रयत्न करत आहेत. व्हायरल व्हिडीओची सुरुवात पाहून तुम्हाला बकऱ्यांचे हे काम सोपं वाटेल. पण जेव्हा व्हिडीओमध्ये धरणाचे एरियल व्ह्यू दाखवले जातात, तेव्हा ते किती अवघड आणि धोक्याचे आहे याची कल्पना येईल.

चला हा व्हिडीओ पाहूया.

IFS सुशांत नंदा यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, हे माउंटन गोट्स आहेत, ज्या इटलीतील धरणाच्या सरळ भिंतीवर चढण्याचा प्रयत्न करत आहेत. हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर होताच व्हायरल झाला आहे. आतापर्यंत 8 हजार पेक्षा जास्त वेळा पाहिले गेला आहे. तर शेकडो लोकांनी लाइक केला आहे.

हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक सतत आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने कमेंट केली आणि लिहिले, ‘म्हणूनच मला वाईल्ड लाईफ खूप आवडते.’ त्याचवेळी, दुसऱ्याने लिहिले, ‘अद्भुत … निसर्ग या प्राण्यांना आश्चर्यकारक क्षमता देतो.’ तिसऱ्याने लिहिले, माउंटन शेळ्या या निसर्गाने बनवलेले अद्भुत प्राणी आहेत.

हा व्हिडिओ पाहिल्यानंतर बरेच लोक आश्चर्यचकितही झाले आहेत. काही लोकांनी कमेंट्समध्ये लिहिले आहे की, हे शेळ्या केवळ धरणाच्या भिंतींवर चढण्याचा प्रयत्न करत नाहीत तर त्यावर धावत आहेत. बर्‍याच लोकांना हेच आश्चर्यकारक वाटलं, तर काही लोक ते भीतीदायक देखील म्हणत आहेत.

हेही पाहा:

Video: महिलेकडून I Love You म्हणत, महाकाय सापाचे Kiss वर Kiss, नेटकरी म्हणाले, बाई, तो साप आहे, टेडी बेअर नाही!

Video: मालकाच्या आदेशावर हवं ते करणारा कोंबडा, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, असे कोंबडे घरोघरी हवे!

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.