काय त्या सुविधा, काय तो थाट! मुकेश अंबानी यांच्या कर्मचाऱ्यांना दिल्लीच्या आमदारापेक्षा दुप्पट पगार
त्यांच्या स्वयंपाकींचा मोलाचा वाटा आहे. मुकेश अंबानी हे आपल्या कर्मचाऱ्यांना आर्थिक सुरक्षा देण्यासाठी प्रसिद्ध आहेत. याआधी त्यांच्या खासगी ड्रायव्हरचा पगार उघड झाला होता.
भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक मुकेश अंबानी साध्या राहणीसाठी ओळखले जातात. विनम्र आणि जमिनीवर असणारा माणूस म्हणून ते लोकांमध्ये लोकप्रिय आहे. मुकेश अंबानी जेवणाच्या बाबतीत एक उत्तम दिनचर्या पाळतात. हा साधेपणा बऱ्याच काळापासून त्यांच्या दिनक्रमाचा भाग आहे. 70 च्या दशकात अंबानी स्टॅनफोर्ड विद्यापीठात असतानाही त्यांनी शाकाहारी आहार खाण्यासाठी कॅलिफोर्निया पालथं घातलं होतं. अंडी खाण्याव्यतिरिक्त अंबानी कोणत्याही प्रकारचे मांस टाळतात आणि कधीकधी ड्रिंक्सदेखील घेत नाहीत.
सामान्य माणसाचा आहार हा डाळ, चपाती, भात आणि हंगामी भाज्यांसारखा असतो. हाच पदार्थ मुकेश अंबानी यांना आपल्या नियमित आहारात घ्यायला आवडतो. श्रीमंत लोकांना स्टॉल्स किंवा आलिशान रेस्टॉरंटमध्ये जेवायचे नसते. मुकेश अंबानी यांना थाई फूड खूप आवडते, पण त्यांच्या संडे ब्रंचमध्ये इडली, डोसा सारखे साऊथ इंडियन फूड असतात.
बिझी शेड्युल असूनही मुकेश अंबानी आपल्या कुटुंबासमवेत जेवतात, असे त्यांची पत्नी नीता अंबानी यांनी एकदा सांगितले होते. मुकेश अंबानी यांच्या शेफला इतर सुविधांसह दरमहा दोन लाख रुपये पगार मिळतो. मुकेशच्या आयुष्यात त्याच्या स्वयंपाकींचा मोलाचा वाटा आहे. मुकेश अंबानी हे आपल्या कर्मचाऱ्यांना आर्थिक सुरक्षा देण्यासाठी प्रसिद्ध आहेत. याआधी त्यांच्या खासगी ड्रायव्हरचा पगार उघड झाला होता. त्यावेळी मुकेशचा खासगी ड्रायव्हर दरमहा दोन लाख रुपये कमावतो, असे समोर आले होते.
ड्रायव्हरच्या पगाराचा खुलासा केल्यानंतर अँटिलियामधील अंबानी यांच्या खासगी शेफना जवळपास तेवढाच पगार मिळतो, अशी माहिती प्रसारमाध्यमांनी दिली आहे. कुटुंबाच्या अँटिलिया या खासगी निवासस्थानी काम करताना स्वयंपाकी महिन्याला दोन लाखांहून अधिक रुपये कमावतो, असे सांगितले जाते. आपल्या कर्मचाऱ्यांना मासिक वेतन देण्याबरोबरच अंबानी आपल्या कर्मचाऱ्यांना विमा आणि शिकवणी प्रतिपूर्ती देखील देतात. अँटिलियाचे काही कर्मचारी आपल्या मुलांना परदेशात शिक्षणासाठी पाठवतात, असा दावाही या अहवालात करण्यात आला आहे. यामुळे अंबानींचा स्टाफ कमाईच्या बाबतीत दिल्लीतील आमदारांपेक्षा एक पायरी वरचा आहे, कारण दिल्लीच्या आमदारांना दरमहा 90,000 रुपये पगार मिळतो.