Jio Recharge Plans : अंबानींकडून जियो यूजर्सना गिफ्ट, आज 7 जानेवारीला रिचार्ज करुन मिळवा इतके सारे फायदे
Jio Recharge Plans : मुकेश अंबानी यांनी जियो यूजर्सना एक गिफ्ट दिलय. आज, जर तुम्ही जियोच्या काही प्लान्सचा रिचार्ज मारलं, तर भरपूर फायदे मिळू शकतात. यात कॉलिंगपासून, डेटा, OTT सब्सक्रिप्शन अशा वेगवेगळ्या सुविधा आहेत.
तुम्ही जियो यूजर असाल, तर हा प्लान तुमच्या फायद्याचा आहे. आज 7 जानेवारीला तुम्ही रिचार्ज केलं, तर जियोच्या 200 दिवसाच्या वॅलिडिटी प्लानचा तुम्हाला फायदा मिळू शकतो. त्यासाठी तुम्हाला जास्त खर्च करण्याची सुद्धा आवश्यकता नाही. या प्लानसाठी तुम्हाला फक्त एकाचवेळी 2025 रुपये खर्च करावे लागतील. या प्लानमध्ये तुम्हाला अनलिमिटेड डेटा ते ओटीटी प्लेटफॉर्मच सब्सक्रिप्शन मिळणार आहे. या प्लानमधून तुम्हाला काय-काय फायदे मिळू शकतात ते जाणून घ्या. त्याशिवाय हजार रुपयांपेक्षा कमीमध्ये कोण-कोणते प्लान मिळतायत, ज्यात एक महिन्यापेक्षा जास्त दिवसांची वॅलिडिटी आहे, त्या बद्दल जाणून घ्या.
2025 रुपयांच्या रिचार्ज प्लानमध्ये काय?
जियोच्या 2025 रुपयांच्या रिचार्ज प्लानमध्ये तुम्हाला 200 दिवसांची वॅलिडिटी मिळतेय. त्याशिवाय यामध्ये तुम्हाला जियो सिनेमाचा सब्सक्रिप्शन मोफत मिळतय. यामध्ये 500 GB डेटा मिळत आहे. तुम्ही दररोज 2.5 GB डेटा यूज करु शकता. अनिलिमिटेड वॉइस कॉलिंग आणि डेली 100 SMS सुद्धा मोफत आहेत.
899 रुपयाच्या प्लानमध्ये मिळणार हे सर्व
जियोच्या या प्लानमध्ये सुद्धा अनेक बेनिफिट्स आहेत. यात 200 GB डेटा फी मिळतोय. या प्लानमध्ये तुम्हाला डेली हाय स्पीड 2GB डेटा प्लस 20 GB डेट मिळणार आहे. या प्लानमध्ये तुम्हाला अनलिमिटेड वॉइस कॉलिंग आणि डेली 100 SMS फ्री मिळतात. त्याशिवाय यामध्ये तुम्हाला जियो सिनेमाच सब्सक्रिप्शन मोफत आहे.
999 रुपयाच्या प्लानमध्ये काय?
999 रुपयाच्या या प्लानमध्ये तुम्हाला 98 दिवसांची वॅलिडिटी मिळणार आहे. या प्लानमध्ये एकूण 196 GB डेटा मिळतो. या प्लानमध्ये तुम्ही दररोज 2GB यूज करु शकता. या प्लानमध्ये अनलिमिटेड वॉईस कॉलिंग आणि डेली 100 SMS फ्री आहेत. त्याशिवाय या प्लानमध्ये यामध्ये तुम्हाला जियो सिनेमाच सब्सक्रिप्शन मोफत आहे. या तीन प्लान्सशिवाय जियोकडून तुम्हाला अनेक रिचार्ज प्लान ऑफर करण्यात आले आहेत. यात हाय स्पीड अनलिमिटेड डेटा आणि अनलिमिटेड वॉइस कॉलिंगची सुविधा आहे.