VIDEO | पोलीस कर्मचाऱ्याने टाकलेला चेंडू पाहून फलंदाजाचे भान हरपले, व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणाले, ‘रोहित भाऊ संघात घ्या’
Mumbai Indians Share Video : सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये एक पोलिस कर्मचारी गोलंदाजी करीत असताना पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे हा व्हिडीओ पाहून अनेकांनी त्यावर कमेंट केली आहे.
मुंबई : जगातल्या अनेकांना क्रिकेटचं वेड आहे. त्या वेडापासून खूप कमी लोकं बचावली आहेत असं म्हणायला हरकत नाही. त्याला वयाची कसलीही मर्यादा नाही. त्याचबरोबर तुम्ही कोणत्याही क्षेत्रात काम करत असाल तरी सुध्दा क्रिकेट खेळू शकता. जिथं कुठं लोकांना बॅट आणि बॉल दिसतो. तिथं लोकं खेळायला सुरुवात करतात. त्यामध्ये असे काही चाहते असतात की, ते आपल्या हिशोबानुसार क्रिकेटच्या खेळाडूची (Mumbai Indians Share Video) निवड करतात. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्याची सगळीकडं चर्चा सुरु आहे. त्या पोलिस कर्मचाऱ्यांची (Police Man Bowling Beautifully In Nets) गोलंदाजी इतकी चांगली आहे की त्याचा व्हिडीओ मुंबई इंडियन्सकडून (Mumbai Indians) शेअर करण्यात आला आहे.
खेळाडूचं स्टंट कुठल्या कुठं उडवतो
आयपीएलची टीम मुंबई इंडियन्स यांच्या खात्यावरुन तो व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. त्या व्हिडीओमध्ये काही मुलं क्रिकेटचा सराव करीत असताना दिसत आहेत. त्यावेळी तिथं आलेल्या एका पोलिस कर्मचाऱ्याने त्या मुलाला गोलंदाजी केली आहे. विशेष म्हणजे तो पोलिस कर्मचारी त्यांच्या पोलिस खात्यातील ड्रेसवरती आहे. ज्यावेळी तो पोलिस कर्मचारी गोलंदाजी करीत आहे. त्यावेळी तिथं असलेल्या एका व्यक्तीने हा प्रकार मोबाईलमध्ये कैद केला आहे. पोलिस कर्मचारी गोलंदाजी करतो आणि समोरच्या खेळाडूचं स्टंप कुठल्या कुठं उडवतो. हा व्हिडीओ मुंबई इंडियन्सने शेअर केला आहे. त्याला कॅप्शन सुध्दा मजेशीर देण्यात आलं आहे. हॅलो 100, आम्हाला ओव्हर स्पीडिंगचा गुन्हा नोंदवायचा आहे. यानंतर पोलिसाचे नावही दुर्जन हरसानी असे लिहिले आहे.
‘Hello 1️⃣0️⃣0️⃣, we’d like to report a case of 𝐟𝐢𝐞𝐫𝐲 𝐩𝐚𝐜𝐞’ 🔥
📽️: Durjan Harsani#OneFamily #MumbaiIndians #MumbaiMeriJaan pic.twitter.com/mKT9QPbO1p
— Mumbai Indians (@mipaltan) August 10, 2023
नेटकऱ्यांना अर्जुन तेंडूलकरची आठवण झाली
मुंबई इंडियन्सकडून शेअर करण्यात आलेल्या व्हिडीओ जोरदार चर्चा झाली आहे. पोलिस कर्मचारी इतकी चांगली गोलंदाजी करीत असल्याचं पाहून अनेकांना धक्का बसला आहे. एका व्यक्तीने लिहीले आहे की, याला टीममध्ये घ्या. एका नेटकऱ्याने सचिन तेंडूलकरचा मुलगा अर्जुन तेंडूलकर यांच्यापेक्षा तो पोलिस कर्मचारी अधिक चांगला गोंलदाजी करीत असल्याचं म्हणाला आहे. एका व्यक्तीने त्या पोलिस कर्मचाऱ्याची कमाल आहे असं म्हटलं आहे.