हा व्हिडीओ पाहताना अंगावर काटा येईल, Mumbai च्या Lifeline चं एकदा सत्य तर बघा! Video Viral
मुंबईला स्वप्नांचे शहर म्हटले जाते. दरवर्षी लाखो लोक आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी या शहरात येतात. त्यामुळेच या शहराची अवस्था आता अशी झाली आहे की, इथे चालायला जागाच शिल्लक राहिलेली नाही. रस्ता असो वा रेल्वे स्थानक, सगळीकडे तितकीच गर्दी असते. मुंबईच्या लाईफलाईनबद्दल बोलायचं झालं तर तर ती आणखी वाईट आहे. असाच एक व्हिडिओ सध्या समोर आला आहे.
मुंबई: मायानगरीत सगळंच कसं अवघड आहे. मुंबई मायानगरी हा नेहमी चर्चेचा विषय असतो. इथे सगळंच धावपळीत आहे. धावपळ केल्याशिवाय या नगरीला काहीच अर्थ नाही. या शहराचा दुसरा अर्थच धावपळ आहे. इथे माणूस सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत नुसता धावत असतो. ज्या व्यक्तीला हे जमतं ती व्यक्ती इथे टिकते, ज्या व्यक्तीला हे जमत नाही ती व्यक्ती इथून निघून जाते. मुंबईची एक लाइफलाईन आहे धावपळ तर दुसरी आहे लोकल! लोकलचे व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतात. इथे ज्या पद्धतीची गर्दी असते ती तर तुम्हाला माहित आहेच. असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय. हा व्हिडीओ बघून तुम्हाला सुद्धा भीती वाटेल.
हा व्हिडिओ पाहिल्यानंतर जो माणूस मुंबईचा नाही किंवा जो रोज त्यात प्रवास करत नाही, तो त्यात प्रवास करण्यापूर्वी दहा वेळा विचार करेल. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला समजेल की, इथे आलेल्या लोकांची स्वप्ने मुंबईच्या लाईफलाईनला कशी लटकलेली आहे. याचे ताजे उदाहरण या व्हायरल व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे, ज्यामध्ये एक मुलगी फुल पॅक ट्रेनमधून प्रवास करतीये.
व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की ट्रेन स्टेशनवरून जाते आणि या दरम्यान एक मुलगी अक्षरशः तिच्या पायांच्या बोटावर लोकलमध्ये लटकत आहे. मुलीचा अर्धा पाय ट्रेनच्या आत आहे तर अर्धा बाहेर. मुलगी बरीचशी बाहेरच्या बाजूनेच आहे. हा व्हिडीओ बघताना अंगावर काटा येतो. ती स्वत:चा जीव धोक्यात घालून कसेबसे आपला समतोल राखते.
1986 I used to travel like this on mumbai local From Ghatkopar to Dadar Putting life on the line Things haven’t changed much pic.twitter.com/0rG1YKoicD
— Dr MJ Augustine Vinod 🇮🇳 (@mjavinod) August 17, 2023
@mjavinod नावाच्या अकाऊंटवरून हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. हजारो लोकांनी हा व्हिडीओ पाहिलाय आणि लाइक केलाय. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिलं आहे की, ‘1986 साली मुंबई लोकलची ही परिस्थिती होती, जी आताही आहे… खरंतर काहीच बदललं नाही.”