Mumbai Local मध्ये पिक्चर स्टाईल भांडण! व्हिडीओ तर बघा…
मुंबई लोकलचे व्हिडीओ नेहमीच व्हायरल होतात. हा व्हिडीओ बघून तर तुम्ही डोक्याला हातच लावाल. हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झालाय. कोणती लोकल आहे याची माहिती समोर आलेली नाही पण व्हिडीओ मध्ये मात्र चांगलीच खडाजंगी दिसून येतेय.
मुंबई: मुंबई लोकलचे व्हिडीओ नेहमी व्हायरल होत असतात. मुंबईची लाईफलाइन असणारी मुंबई लोकल हिला तशी प्रसिद्धीची गरज नाही. माणूस मुंबईत आला की त्याची लोकलशी ओळख होतेच. लोकलमध्येच इथल्या लोकांचा सगळ्यात जास्त वेळ जातो. लोकल म्हणजे मुंबईच्या लोकांचं दुसरं घरच! इथेच ते नाचतात, भजन-कीर्तन करतात, भाज्या निवडतात, उभ्या-उभ्या पटकन काहीतरी खाऊन घेतात. जे दिवसाचं टार्गेट आहे जितकं होईल तितकं लोकल मध्ये वेळ न दवडता करून घेतात. अशी ही लोकल आणि तिचे किस्से. आता असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय.
खडाजंगी व्हायरल!
या व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसून येतंय की ही मुंबई लोकल आहे. लोकल मध्ये दोन पुरुष एकमेकांसोबत भांडण करतायत. यांची खडाजंगी आता व्हायरल होतीये. हे दोघे भांडत असताना बाकी लोकं मध्यस्थी करून भांडण मिटवायचा प्रयत्न करतात. हे दोघे अगदी मारामारीपर्यंत जाऊन पोहचतात. लोकल मधील हे दृश्य अनेकांना नवीन नाही. इथे लोक बऱ्याच कारणांनी एकमेकांशी भांडत असतात. लेडीज डब्याचे सुद्धा किस्से तुम्ही ऐकून असालच.
Kalesh b/w Two Man inside Mumbai locals over seat issues pic.twitter.com/jx8RRrdAJn
— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) September 1, 2023
व्हिडीओ प्रचंड व्हायरल
इतक्या गर्दी असणाऱ्या मुंबई लोकलमध्ये दोन जण बसण्यावरून वाद घालत आहेत. हा वाद साधासुधा नसून ही भांडणे अक्षरशः थांबवावी लागलीत. आधी हे दोघे एकमेकांवर आवाज चढवून बोलतात. त्यानंतर लगेचच एकजण दुसऱ्याला धक्का मारतो मग दुसरा पण त्याला धक्का मारतो. पहिला त्याला चांगलाच पकडून मारायला जातो, दुसरा पण शांत बसत नाही एकदम पिक्चर स्टाईल हाणामारी सुरु होते. हा व्हिडीओ तिथे उपस्थित असणाऱ्या एकाने शूट केला. व्हिडीओ प्रचंड व्हायरल झालाय.