त्या पाकिस्तानी मुलीचा डान्स आठवतोय? या मुलाने सेम तसाच व्हिडीओ बनवला, व्हायरल!
लग्नात पाकिस्तानी नवरीने केलेला डान्स खूप पाहिला गेला आणि सोशल मीडियावर इतकी चर्चा झाली की लोक तिच्या डान्स स्टेप्स पुन्हा रिक्रिएट करू लागले.
काही दिवसांपूर्वी एका पाकिस्तानी महिलेने लता मंगेशकर यांच्या ‘मेरा दिल ये पुकारे आजा..’ या प्रसिद्ध गाण्यावर शानदार डान्स केला होता. ते नृत्य केवळ पाकिस्तानातच नव्हे तर भारतातही प्रचंड व्हायरल झाले. लाखो लोकांना हे गाणं खूप आवडलं आणि आजही इन्स्टाग्रामसह सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हे ट्रेंडिंग आहे. लग्नात पाकिस्तानी नवरीने केलेला डान्स खूप पाहिला गेला आणि सोशल मीडियावर इतकी चर्चा झाली की लोक तिच्या डान्स स्टेप्स पुन्हा रिक्रिएट करू लागले. एका भारतीय व्यक्तीने व्हायरल डान्स स्टेप्स रिक्रिएट केल्याचा एक व्हिडिओ ऑनलाइन समोर आलाय.
पाकिस्तानी मुलीप्रमाणे या डान्सची कॉपी करत मुंबईच्या एका रहिवाशाने डान्स करण्याचा प्रयत्न केला आणि चार दिवसांतच तो व्हायरल झाला.
युजर अरसलान खानने हा व्हिडिओ आपल्या इंस्टाग्रामवर शेअर करत लिहिले की, “जेव्हा जेव्हा मी इन्स्टाग्राम स्क्रोल फीड रिफ्रेश करतो, तेव्हा हेच दिसते, सोचा बना ही लू.” त्याच्या प्रचंड ऊर्जेने आणि परफेक्ट स्टेप्सने लाखो लोक मोहित झाले.
हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी त्याचं कौतुक केलं. त्याच्या प्रोफाइलमध्ये दिलेल्या बायोनुसार, तो मुंबई शहरात राहतो. ही क्लिप तीन दिवसांपूर्वी इन्स्टाग्रामवर पोस्ट करण्यात आली होती आणि त्यानंतर तिला ३.४ दशलक्षाहून अधिक व्ह्यूवज मिळाले आहेत.
View this post on Instagram
तसंच त्याला अनेक नेटिझन्सच्या प्रतिक्रियाही आल्या. आणखी एका युझरने लिहिले की, “यार तू खूप चांगला आहेस, मी हे 50 वेळा तरी पाहिले असेल.”