मुंबई पोलिसांची बातच न्यारी ! बँड पथकानं सादर केलं ‘ऐ वतन तेरे लिए’ गाणं, व्हिडीओ व्हायरल

मुंबई पोलिसांच्या बँडची सगळीकडे चर्चा होत असते. बँड पथकाने देशभक्तीन ओतप्रोत असलेले कर्म चित्रपटातील गीत सादर केले आहे. फक्त वाद्यांच्या मदतीने मुंबई पोलिसांनी हे गाणे जसेच्या तसे साकारले आहे. या पूर्ण गाण्याचा व्हिडीओ मुंबई पोलिसांनी त्यांच्या इन्स्टाग्रामच्या ऑफिशियल अकाऊंटवर शेअर केला आहे.

मुंबई पोलिसांची बातच न्यारी ! बँड पथकानं सादर केलं 'ऐ वतन तेरे लिए' गाणं, व्हिडीओ व्हायरल
mumbai police band
Follow us
| Updated on: Sep 29, 2021 | 11:21 PM

मुंबई : आपल्या देशात पोलीस दलामध्ये सर्वात जास्त चर्चा कोणाची होत असेल तर ते म्हणजे मुंबई पोलीस. एखाद्या गुन्ह्याची उकल करण्यापासून ते शहरात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यापर्यंत मुंबई पोलीस आपली जबाबदारी चोखपणे पार पाडतात. या बाबतीत मुंबई पोलिसांचा हात कोणीही धरू शकत नाही. बरं मुंबई पोलीस फक्त एवढ्याच कामात तरबेज आहेत असे नाही. तर या पोलिसांच्या बँड पथकाचीदेखील संपूर्ण भारतामध्ये चर्चा होत असते. सध्या याच बँडचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये मुंबई पोलिसांच्या बँडने सादर केलेलं सादरीकरण भन्नाट आहे.

मुंबई पोलिसांच्या बँड पथकाचा भन्नाट प्रयोग

मुंबई पोलिसांच्या बँडची सगळीकडे चर्चा होत असते. सध्या या बँड पथकाने देशभक्तीने ओतप्रोत असलेले कर्मा चित्रपटातील गीत सादर केले आहे. फक्त वाद्यांच्या मदतीने मुंबई पोलिसांनी हे गाणे जसेच्या तसे साकारले आहे. या पूर्ण गाण्याचा व्हिडीओ मुंबई पोलिसांनी त्यांच्या इन्स्टाग्रामच्या ऑफिशियल अकाऊंटवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहून संपूर्ण देशभरात मुंबई पोलिसांचे तोंडभरून कौतूक केले जात आहे.

‘ऐ वतन तेरे लिए’ गाण्याला वाद्यांच्या माध्यमातून जिवंत केलं

व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ अतिशय प्रेरणादायी असा आहे. यामध्ये मुंबई पोलीस कर्मा चित्रपटातील ‘ऐ वतन तेरे लिए’ या हिंदी गाण्याची धून वाजवत आहे. यासाठी मुंबई पोलिसांनी वेगवेगळ्या वाद्यांची मदत घेतली आहे. पोलिसांनी अतिशय लयबद्ध तसेच सर्व ताळमेळ साधत हे सादरीकण केले आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी मुंबई पोलिसांचे कौतुक करत आहेत.

पाहा व्हिडीओ :

यापूर्वीदेखील जेम्स बॉन्डच्या थीम म्यूझिकचे सादरीकरण 

मुंबई पोलिसांचे हे बँड पथक वेगवेगळे प्रयोग करत असते. यापूर्वी याच बँड पथकाने जेम्स बॉन्डच्या थीम म्यूझिकचे सादरीकरण केले होते. ही म्यूझिक मुंबई पोलिसांनी जसीच्या तशी उभी केली होती. पोलिसांचा हा व्हिडीओदेखील चांगलाच व्हायरल झाला होता.

इतर बातम्या :

Video: LED वर शिकवायला गेले आणि रोमॅन्टिंक गाणं सुरु झालं, पोरांचा शाळेच्या वर्गातला दंगा सोशल मीडियावर व्हायरल

काय सांगता ! ब्रोकोली तोडण्यासाठी मजुरांना तब्बल 63 लाख रुपयांचं पॅकेज, जाहिरातीची एकच चर्चा

Video : माकडाने कुत्र्याला शिकवला चांगलाच धडा, व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल आश्चर्यचकित!

(mumbai police band performs hindi song aye watan tere liye karma film song see video)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.