Marine Drive वरचा पोलिसांचा हा व्हिडीओ पाहिलात का?

सोशल मीडियावर मुंबई पोलिसांच्या व्हिडिओने लोकांची मने जिंकली.

Marine Drive वरचा पोलिसांचा हा व्हिडीओ पाहिलात का?
mumbai policeImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Dec 27, 2022 | 12:50 PM

रस्त्यावर वाहन चालवताना, पोलिस चांगलेच लक्ष ठेवून असतात की चालकांकडून वाहतुकीचे नियम मोडले जाणार नाहीत,अनेकदा तर आपल्याला आपल्याच चुकीमुळे चलन फाडावे लागते. जेव्हा जेव्हा आपण पोलिस आपल्या दिशेने येताना पाहतो तेव्हा आपणच आश्चर्यचकित होतो. मग कुठे जाऊन आपण विचार करतो की आपण नेमकी काय चूक केली असेल.

मात्र, प्रत्येक वेळी असे घडतेच असे नाही. सोशल मीडियावर मुंबई पोलिसांच्या व्हिडिओने लोकांची मने जिंकली. व्हिडिओ पाहून लोक अंदाज लावत आहेत की, दोन पोलिस बाईकवर बसून पेट्रोलिंगसाठी बाहेर पडले होते.

दरम्यान, त्यांना रस्त्याच्या कडेला काही तरुण फिरताना दिसले, त्यावर पोलिसांनी त्यांना थांबवून गिटार वाजवण्यास सांगितले.

मुंबईतील मरीन ड्राईव्ह इथे एका तरुणाने दोन पोलिस अधिकाऱ्यांसमोर ‘केसरिया तेरा इश्क है पिया’ गायलं.

हा व्हिडिओ शिवा नावाच्या कलाकाराने इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे. या क्लिपमध्ये तो मुंबई पोलिसांचे दोन पोलिस आणि त्याच्यासोबत उभे असलेले दोन लोक रस्त्याच्या कडेला बसून आपला परफॉर्मन्स देत आहे.

त्यांनी ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटातील ‘केसरिया’ हे लोकप्रिय गाणे गिटारवर वाजवले, जे पाहून उपस्थित सर्व लोक मंत्रमुग्ध झाले. सगळ्यांच्या चेहऱ्यावर मोठं हसू दिसत होतं.

व्हिडिओला दिलेल्या कॅप्शननुसार, हा परफॉर्मन्स दक्षिण मुंबईतील मरीन ड्राईव्हवर रेकॉर्ड करण्यात आलाय. परफॉर्मन्सच्या शेवटी बाईकवर बसलेला पोलिस हसताना दिसतो. त्याने शिवाच्या आवाजाची स्तुती केली.

व्हिडिओ शेअर करताना सिंगरने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘ त्यांच्या हास्याने माझे मन जिंकले.’ हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला.

View this post on Instagram

A post shared by SHIV (@shi.vxm)

इन्स्टाग्रामवर सुमारे 1.5 लाख लाईक्स आणि 10 लाख व्ह्यूज मिळाले आहेत. पोलिसांसाठी गिटार वाजवणाऱ्या व्यक्तीचे हावभाव पाहून नेटिझन्स आश्चर्यचकित झाले आहेत आणि आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.