मुंबईतील पावसापासून वाचण्यासाठी जुगाड… आनंद महिंद्रा यांनी ट्विट केलेला व्हिडिओ व्हायरल
anand mahindra: आनंद महिंद्रा यांनी शेअर केलेला व्हिडिओ फक्त 14 सेकंदाचा आहे. त्यामध्ये एक व्यक्ती आपल्या छत्रीला हातात पकडण्याऐवजी पाठिवर टांगलेला दिसत आहे. एखाद्या सॅगप्रमाणे पाठिवर छत्री लटकवून तो जात आहे. त्यासाठी छत्रीच्या हँडलमध्ये दोन हँगरचा वापर त्याने केला आहे.
Anand Mahindra News Post : मान्सून सुरु झाल्यावर मुंबईतील पावसाची चर्चा सुरु होते. मुंबईत कमी वेळेत जास्त होणाऱ्या पावसामुळे मुंबईची लाईफलाईन समजली जाणारी लोकल सेवा विस्कळीत होते. मुंबईतील सखल भागात साचणारे पाणी अन् नाले सफाईची चर्चा ‘नेहमीच येतो पावसाळा’ याप्रमाणे सुरु असते. आता मुंबईतील पावसावर अब्जाधीश उद्योगपती महिंद्रा एंड महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. पावसापासून वाचण्यासाठी तयार केलेला जुगाड या व्हिडिओत आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ चांगला व्हायरल झाला असून त्याची जोरदार चर्चा होत आहे.
काय आहे त्या व्हिडिओत
आनंद महिंद्रा सोशल मीडियावरील (Social Media) त्यांच्या X अकाउंट वेगवेगळे व्हिडिओ शेअर करत असतात. त्यांना चांगला प्रतिसाद मिळत असतो. आता त्यांनी पावसापासून बचाव कसा करावा? या संदर्भातील एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत छत्रीच्या नवीन पद्धतीने वापर करताना दाखवण्यात आले आहे. आनंद महिंद्र यांनी पावसापासून वाचण्यासाठी हा बेस्ट आयडिया असल्याचे म्हटले आहे.
14 सेकंदाचा व्हिडिओ
आनंद महिंद्रा यांनी शेअर केलेला व्हिडिओ फक्त 14 सेकंदाचा आहे. त्यामध्ये एक व्यक्ती आपल्या छत्रीला हातात पकडण्याऐवजी पाठिवर टांगलेला दिसत आहे. एखाद्या सॅगप्रमाणे पाठिवर छत्री लटकवून तो जात आहे. त्यासाठी छत्रीच्या हँडलमध्ये दोन हँगरचा वापर त्याने केला आहे. त्यानंतर छत्री बॅग आपल्या पाठीवर लटकवून दोन्ही हातात सामान घेऊन तो जात आहे.
Finally, we’re seeing some consistent rain in Mumbai this monsoon.
Not heavy enough for our liking, but it’s probably time to plan our ‘wardrobe for wetness.’
May be a good idea to think about a ‘wearable’ umbrella
Clever…pic.twitter.com/7pjyFAMJ6O
— anand mahindra (@anandmahindra) June 22, 2024
ही चांगली आयडिया
आनंद महिंद्रा यांनी या व्हिडिओला मुंबईतील पावसादरम्यान चांगली आयडीया असे कॅप्शन दिले आहे. त्यांनी लिहिले आहे की, मुंबईत मान्सूनमध्ये सतत पाऊस पडत असतो. आता पावसापासून वाचण्यासाठी फुलप्रूफ योजना बनवण्याची वेळ आली आहे. त्यासाठी योग्य छात्री (Wearable Umbrella) संदर्भात विचार करणे चांगला पर्याय आहे. आनंद महिंद्राचा या व्हिडिओला हजारो जाणांनी लाईक केले आहे. लाखो लोकांनी तो पहिला आहे. त्यावर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.