मुंबईकर नसते तर ही गाडी वाचली नसती!
तेव्हा मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. शेवटी मुंबईच्या लोकांनीच या गाडीवाल्याला मदत केली. थोड्या कष्टानंतर या लोकांना यश आले.
वाहनांचा वेग कमी करण्यासाठी स्पीड ब्रेकरचा वापर केला जातो. पण रस्त्यावर असे स्पीड ब्रेकरही आहेत जे वेग कमी करण्याऐवजी वाहनांचे नुकसान करतात! काही वेळा काही ‘धोकादायक स्पीड ब्रेकर’मुळे अपघातही होतात. ताजे प्रकरण मुंबईचे आहे, जिथे रस्त्यावर इतका मोठा स्पीड ब्रेकर तयार करण्यात आलाय की त्यावर जग्वार कंपनीची एक लक्झरी कार अडकली. ही गाडी जेव्हा अडकली तेव्हा मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. शेवटी मुंबईच्या लोकांनीच या गाडीवाल्याला मदत केली. थोड्या कष्टानंतर या लोकांना यश आले आणि गाडी स्पीड ब्रेकर वरून पुढे गेली.
हा व्हिडिओ 27 फेब्रुवारी @RoadsOfMumbai ट्विटर हँडलवर पोस्ट करण्यात आला होता. त्याने कॅप्शनमध्ये लिहिले – मुंबईत लोक लक्झरी कार का विकत घेतात? या क्लिपला आतापर्यंत 32 हजारांहून अधिक व्ह्यूज आणि पाचशेहून अधिक लाइक्स मिळाले आहेत. यावर सर्व युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या. आर्थिक राजधानीत चांगले रस्ते का नाहीत, असा प्रश्न काहींनी विचारला. या पोस्टवर बीएमसीने (@mybmcWardRC) प्रतिक्रिया दिली असून या प्रकरणी कारवाई केली जाईल, असे म्हटले आहे. हा व्हिडिओ इन्स्टाग्राम युजर ‘सिड शर्मा’ (simplysid08) ने पोस्ट केला आहे, जो इंटरनेटवर ट्रेंडिंग आहे.
View this post on Instagram
हा व्हायरल व्हिडिओ पाहिल्यानंतर काहींनी भारताचे रस्ते लक्झरी वाहनांसाठी कधी पात्र होतील असे म्हटले तर काही युजर्सनी सांगितले की, त्यांच्या भागातही असे स्पीड ब्रेकर आहेत ज्यामुळे त्यांचे वाहन अनेकवेळा खराब होते! एका व्यक्तीने सांगितले की दुबईचे रस्ते लक्झरी कारसाठी सर्वोत्तम आहेत. त्याचप्रमाणे लोक मदतीसाठी एकत्र आले हे पाहून खूप बरं वाटलं अशी मुंबईकरांची भावना आहे. याशिवाय एका व्यक्तीने लिहिलं- कार ड्रायव्हर मूर्ख आहे, आधी गाडी डावीकडे वळवायची मग लगेच उजवीकडे वळवायची, डावीकडून गाडी व्यवस्थित बाहेर पडली असती. सरळ चढवल्यामुळे गाडी तराजू सारखी मधोमध अडकली आणि खाली चेचिस घासलं गेलं ते वेगळं.