Mysterious Creatures: समुद्र किनाऱ्यावर सापडला रहस्यमय मृत प्राणी, वैज्ञानिक म्हणाले, याला पहिल्यांदा कधीही पाहिलेले नाही

या ठिकाणी राहणाऱ्या स्थानिकांनी आणि वैज्ञानिंकांनी सांगितले की या प्रकारचा प्राणी यापूर्वी कधीही समुद्रात किंवा किनाऱ्यावर पाहिलेला नाही. हा प्राणी खोल समुद्रात राहणारा असावा, अशी शक्यताही समुद्र वैज्ञानिंकानी व्यक्त केली आहे. वेगाने येणाऱ्या लाटांसोबत हा प्राणी किनाऱ्यावर वाहत आला असावा, अशी शक्यताही वर्तवण्यात आली आहे.

Mysterious Creatures: समुद्र किनाऱ्यावर सापडला रहस्यमय मृत प्राणी, वैज्ञानिक म्हणाले, याला पहिल्यांदा कधीही पाहिलेले नाही
ऑस्ट्रेलियन बिचवर रहस्यमयी प्राणी Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Jul 29, 2022 | 9:35 PM

सिडनी – ऑस्ट्रेलियात (Australia)सिडनीच्या समुद्रकिनाऱ्यावर एक रहस्यमय प्राणी (Mysterious Creatures)दिसल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. वेगळाच असणारा हा प्राणी समुद्र किनाऱ्यावर (beach)मृतावस्थेत सापडला आहे. समुद्र किनाऱ्यावर फिरायला येणाऱ्यांनी या प्राण्याला सर्वात प्रथम पाहिले. मात्र कुणाचीच या प्राण्याजवळ जाण्याची हिंमतच होत नव्हती. अनेक तास उलटल्यानंतरही या प्राण्याची हाचचाल दिसत नाही, हे पाहिल्यानंतर काही जणांनी या प्राण्याच्या जवळ जाण्याचा धीर गोळा केला. या प्राण्याच्या पाठीवर समुद्री झुडपे जमा झालेली होती. या ठिकाणी राहणाऱ्या स्थानिकांनी आणि वैज्ञानिंकांनी सांगितले की या प्रकारचा प्राणी यापूर्वी कधीही समुद्रात किंवा किनाऱ्यावर पाहिलेला नाही. हा प्राणी खोल समुद्रात राहणारा असावा, अशी शक्यताही समुद्र वैज्ञानिंकानी व्यक्त केली आहे. वेगाने येणाऱ्या लाटांसोबत हा प्राणी किनाऱ्यावर वाहत आला असावा, अशी शक्यताही वर्तवण्यात आली आहे.

सिडनीच्या ग्रीनहिल्स बीचवर सापडला प्राणी

हा प्राणी सिडनीच्या ग्रीनहिल्स समुद्र किनाऱ्यावर मृतावस्थेत सापडल्याची माहिती आहे. स्थानिक रहिवासी विकी हेन्सन यांनी सांगितले की, सकाळच्या वेळी कुत्र्याला फिरायला आमले असताना त्यांना पहिल्यांदा हा प्राणी दिसला. या प्राण्याचा व्हिडीओ करणाऱ्या एका व्यक्तीने सांगितले की, सुरुवातीला या प्राण्याच्या जवळ जाण्याची कुणाची हिमंतच होत नव्हती. सगळेच जण घाबरलेले होते. मात्र बराच काळ त्याची काही हालचाल दिसली नाही, त्यानंतर त्याच्या जवळ जाण्याची हंमत आम्ही दाखवली. या प्राण्याच्या शरिराची रचना वेगळ्या प्रकाराची आहे.

विचित्र आणि राक्षसी जीव, स्थानिकांच्या प्रतिक्रिया

एका महिलेने असा दावा केला आहे की, या प्राण्यासा समुद्र किनाऱ्यावर तिने चालताना पाहिलेले होते. तिने या प्राण्याला विचित्र, राक्षसी आणि घाबरवणारा असल्याचे सांगितले आहे. निसर्ग आणि समुद्र या प्राण्याला घेऊन पुन्हा समुद्रात जाईल, असा विश्वास या महिलेला वाटत होता. मात्र आता तो प्राणी मेलेला आहे. या अजीबोगरीब प्राण्याला पाहण्यासाठी सिडनीच्या ग्रीनहिल्स बीचवर लोकांची गर्दी झाली होती. हा प्राणी यापूर्वी कधीही पाहिला नसल्याची कुजबूजची त्यांच्यात सुरु होती. या प्राण्याची रचना पाहून सगळ्यांना आश्चर्याचा धक्काच बसत होता.

वैज्ञानिकांनी या प्राण्याला घेतले ताब्यात

ऑस्ट्रेलियाच्या समुद्र वैज्ञानिकांनी या मृत प्राण्याला त्यांच्या ताब्यात घेतले आहे. या प्राणी कोणत्या प्रजातीचा आहे, त्याचा मृत्यू कोणत्या कारणांमुळे झाला याचा शोध आता वैज्ञानिक घेणार आहेत. निसर्ग आपल्या किती कल्पनेपलिकडचा आहे, याचे हे उत्तम उदाहरण असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.