Viral Video : ‘ढल गया दिन हो गई शाम’गाण्यावर जवानांची परेड, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

सध्या इंटरनेटवर एका परेडचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. ही परेड इतर परेडपेक्षा खास असून यामध्ये जवान एका हिंदी गाण्यावर मार्च करत आहेत.

Viral Video : ‘ढल गया दिन हो गई शाम’गाण्यावर जवानांची परेड, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
viral parede
Follow us
| Updated on: Jun 13, 2021 | 5:48 PM

कोहिमा : प्रत्येक भारतीयाच्या मनात आपल्या सैन्याबद्दल मान आणि प्रेम असते. त्यामुळे सैनिकांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. जे पाहून नेटकरी भारावून जातात आणि सैन्यावरील त्याचं प्रेम आणखीच वाढतं. दरम्यान नागालँड येथील जवानांचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत असून यात सैन्याने परेड नेहमीपेक्षा थोडी हटके अंदाजात केली आहे. या परेडमध्ये जवान बॉलीवुडचं प्रसिद्ध गाणं ‘ढल गया दिन हो गई शाम’ यावर परेड करत आहेत. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही चेहऱ्यावर हसू उमटेल हे नक्की! (Nagaland Police Jawan Did Parade On Song Dhal gaya din ho gayi shaam Video Goes Viral)

इंटरनेरवर व्हायरल होणारा हा परेडचा व्हिडीओ नागालँडमधील आहे. यात नागालँड पोलिस अभिनेता जितेंद्रच्या ‘ढल गया दिन हो गई शाम’ या प्रसिद्ध गाण्यावर परेड करत आहे. ज्यात एक जवान ‘ढल गया दिन’ हे गाणं गातोय तर सर्व जवान एका तालात त्याला साद घालत मार्च करत आहेत. या व्हिडीओला बरेच लाईक मिळत असून लोक एकमेंकाना हा व्हिडीओ शेअर करत आहेत. या व्हिडीओमधील जवान गाण्यावर अनोख्या प्रकारे करणारी परेड मनापासून एन्जॉय करत आहेत.

कॅप्शनही तितकच भन्नाट

हा व्हिडीओ आयपीएस ऑफिसर रूपिन शर्मा यांनी ट्विटरवर पोस्ट केला आहे. सोबतच,‘ढल गया दिन हो गई शाम, जाने दो, जाना है. आगे जाकर क्या करोगे, पीछे मुड़.” असे हटके कॅप्शन देखील दिले आहे. या कॅप्शनसह हा हटके व्हिडीओ ट्विटरवर आतापर्यंत 18 हजारहून अधिक युजर्सनी पाहिला आहे. तर अनेकांनी पसंद करत शेअर देखील केला आहे.

हे ही वाचा : 

Video | दहा फुटाचा साप चढला विजेच्या खांबावर, शॉक लागल्यामुळे घडला मोठा अपघात, व्हिडीओ व्हायरल

Video | चेहरा झाककेली महिला, एक हात मागे; समोरच्या हतबल तरुणाचं नेमकं काय होणार ?, पाहा संपूर्ण व्हिडीओ

Video | पाणी पिण्यासाठी जीव व्याकूळ, तहानलेल्या हत्तीचा संयम एकदा पहाच !

(Nagaland Police Jawan Did Parade On Song Dhal gaya din ho gayi shaam Video Goes Viral)

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.