Metro मध्ये मुलींचा अनोखा फॅशन वॉक, दिल्ली मेट्रो नाही यावेळी नागपूर मेट्रो!
या व्हिडिओला 2 लाखांहून अधिक लाईक्स आहेत आणि करोडो लोकांनी हा व्हिडीओ पाहिलाय. नागपूर मेट्रोचा हा व्हिडीओ खूप व्हायरल झालाय. नागपूर मेट्रोने तर दिल्ली मेट्रोच्या व्हिडीओंना सुद्धा मागे टाकलंय. व्हिडीओ पाहताना असं वाटतं की आपण रॅम्प वॉक बघत आहोत. आपण हे सुद्धा विसरून जातो की हा व्हिडीओ मेट्रोमधला आहे.
नागपूर: मेट्रोचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. कधी लोक मेट्रोमध्ये नाचत काय असतात, कधी गात काय असतात. दिल्ली मेट्रो तर बाकी सगळं सोडा पण अशाच गोष्टींमुळे जास्त फेमस आहे. दिल्ली मेट्रोचे व्हिडीओ आपल्याला रोज दिसतात, इथे काही ना काही व्हायरल होतच असतं. आपण सुद्धा ते व्हिडीओ पुन्हा पुन्हा बघतो. या व्हिडिओचं प्रमाण आता इतकं वाढलं आहे की प्रशासन सुद्धा यावर लक्ष ठेऊन असतं. जरा कुठला विचित्र व्हिडीओ दिसला की प्रशासन त्यावर कारवाई करतं. असाच एक मेट्रोमधला व्हिडीओ व्हायरल झालाय पण हा व्हिडीओ आहे नागपूरच्या मेट्रोचा! होय. कधीही व्हायरल व्हिडीओ साठी चर्चेत नसणारी नागपूर मेट्रो. आज एका व्हायरल व्हिडीओमुळेच चर्चेत आहे.
व्हिडीओ खूप व्हायरल
आजवर आपण मेट्रोमध्ये डान्सचे व्हिडीओ पाहिले. गाणं म्हणतानाचे व्हिडीओ पाहिले. अनेक चित्रविचित्र व्हिडीओ पाहिले पण कधी मेट्रो मध्ये फॅशन शो पाहिलाय का? तुम्हाला आश्चर्य वाटेल की नागपूरच्या मेट्रोमध्ये चक्क फॅशन शो करण्यात आलाय. कधीही व्हायरलच्या चर्चेत नसणारी नागपूर मेट्रो आज मात्र या फॅशन वॉकमुळे खूप चर्चेत आहे. हा व्हिडीओ खूप व्हायरल झालाय.
View this post on Instagram
मेट्रोमध्ये रॅम्प वॉक
मेट्रोचा डब्बा तसा रिकामाच दिसतोय. यात एक-एक मुलगी छान नटून- थटून फॅशन वॉक करताना दिसून येते. बाजूला प्रेक्षक सुद्धा आहेत. या सगळ्या मुली मेट्रोच्या डब्ब्यात एका लाईन मध्ये येतायत. फॅशन वॉकमध्ये एकदम स्टाईलने त्या पुढे येतायत. आपण रॅम्प वॉक जसा नेहमी पाहतो तसाच हा रॅम्प वॉक मेट्रोमध्ये केला जातोय. खूप सुंदर कपडे परिधान करून या मुली हा फॅशन वॉक करत आहेत. तुम्ही हा व्हिडीओ पुन्हा पुन्हा बघाल. nagpur_xfactor_ नावाच्या अकाऊंटने हा व्हिडीओ इंस्टाग्रामवर शेअर केलाय.