Uttarakhand Flood: पुराच्या पाण्यात पाय घट्ट रोवले आणि नागरिकांना वाचवलं, भारतीय सैनिकांची ताकद दाखवणारा व्हिडीओ
पुरामध्ये अडकलेल्या लोकांना वाचवतानाचा लष्कराचा एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यात ते मानवी साखळी बनवत लोकांना सुरक्षित बाहेर काढत आहेत.
नैनीताल: उत्तराखंडमध्ये 72 तासांपासून सतत पडणाऱ्या पावसामुळे त्राहीमाम माजला आहे. सोशल मीडियावर यासंदर्भातील अनेक फोटो आणि धक्कादाय व्हिडिओ समोर आले आहेत. पुरामध्ये अडकलेल्या लोकांना वाचवतानाचा लष्कराचा एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यात ते मानवी साखळी बनवत लोकांना सुरक्षित बाहेर काढत आहेत. (nainital flood Indian Army Save People to making human Chain video goes viral on social media)
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, पुराच्या पाण्यात सैन्याचे जवान मानवी साखळी करून लोकांना मदत करत आहेत. पाण्याचा प्रवाह इतका वेगवान आहे की, बघणारे क्षणभर स्तब्ध होतात. पण भारतीय लष्कराचे सैनिक तिथे पाय घट्ट रोवून उभे राहत, लोकांना मदत करत आहेत.
हा व्हिडीओ पाहा
Salute these Bravehearts ❤️???#Nainital #Uttrakhand pic.twitter.com/ZdO5Fxvp3p
— Srinivas BV (@srinivasiyc) October 19, 2021
हा व्हिडिओ ट्विटर युजर rinsrinivasiyc ने शेअर केला आहे. त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले, ‘या शूरवीरांना सलाम.’ बातमी लिहीपर्यंत हा व्हिडिओ 61 हजारांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. यासोबतच सोशल मीडिया युजर्स सैनिकांच्या धाडसाचे कौतुक करत आहेत.
या व्हिडिओवर कमेंट करताना, एका युजरने लिहिले, ‘हे आपल्या देशाचे खरे नायक आहेत.’ तर दुसऱ्याने लिहिले, ‘हे आहेत म्हणून आम्ही आहोत, हे असताना आपल्याला कुणालाही घाबरण्याची गरज नाही.’ दोन दिवसांच्या सततच्या पावसानंतर संपूर्ण राज्यात प्रलयाची परिस्थिती आहे. अनेक ठिकाणी पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. नद्या आणि तलाव ओसंडून वाहत आहेत, तर भूस्खलनाच्याही अनेक बातम्या येत आहेत. अशा परिस्थितीत नैनीतालमधून बाहेर आलेली दृश्यं भीतीदायक आहेत.
हेही पाहा:
दारुडा बसमध्ये करीत होता छेडछाड, भर रस्त्यात महिलेने अशी घडवली अद्दल
Video: भाजपच्या मंत्र्यांनी महिला उमेदवाराच्या केसांत हात घातला, काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर, पण खरं काहीतरी वेगळंच!