Jaya Kishori Marriage: बागेश्वर बाबांच्या नाही तर यांच्या प्रेमात कथावाचक जया किशोरी, लग्नासाठी ठेवली ही अट
जया यांनी आजपर्यंत बागेश्वर धाम सरकारवर कोणतीही प्रतिक्रिया दिली नसली तरी आपले पहिले प्रेम त्यांनी अनेकदा व्यासपीठावरून उघडपणे सांगितलंय. जया किशोरी लग्नाविषयी म्हणतात की, लग्नाबाबत त्यांची एक अट आहे.
अलीकडेच कथाकार जय किशोरी यांचे नाव बागेश्वर धाम सरकार पंडित धीरेंद्र शास्त्री यांच्याशी जोडले गेले. यानंतर स्वत: बागेश्वर धाम यांनी या सगळ्याला नकार देत जया यांना आपली बहीण म्हटले होते. जया यांनी आजपर्यंत बागेश्वर धाम सरकारवर कोणतीही प्रतिक्रिया दिली नसली तरी आपले पहिले प्रेम ‘भगवान कृष्ण’ असल्याचे त्या नेहमी सांगतात आणि हे त्यांनी अनेकदा व्यासपीठावरून उघडपणे सांगितलंय. जया किशोरी लग्नाविषयी म्हणतात की, योग्य वेळ आल्यावर त्या नक्कीच लग्न करतील. पण लग्नाबाबत त्यांची एक अट आहे, आता जाणून घेऊया काय आहे ही अट.
जया किशोरी यांनी लिंगाष्टकम, शिव तांडव स्त्रोत, मधुराष्टकम्रा, शिवपंचाक्षर स्तोत्रम्, दारिद्रय दहन शिव स्तोत्रम् अशा अनेक अवघड स्तोत्रांचं पाठांतर अगदी लहान वयातच केलंय. आपल्या भजन, कथांसोबतच जया किशोरी आपल्या लग्नाबद्दलही चर्चेत असतात.
जया किशोरी यांनी याबाबत अनेकदा आपले विचार मोकळेपणाने मांडले आहेत. त्या म्हणतात की हो त्या नक्कीच लग्न करतील. कारण त्या अगदी सामान्य मुलीसारख्याच आहेत. त्या लग्न करतील, पण अजून वेळ आहे. जया किशोरीच्या वडिलांनीही अनेकदा त्यांच्या लग्नाबद्दल सांगितले आहे.
जया किशोरी कोणाशी लग्न करणार याबाबत मात्र कोणतीही माहिती मिळालेली नाही. पण हो, लग्नासंदर्भात त्यांनी एक अट नक्कीच घातली आहे. एका टीव्ही चॅनेलने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये जया किशोरी म्हणाल्या की, त्यांचे लग्न कोलकात्यातच झाले तर बरे होईल. असं झाल्यास त्यांना आपल्या घरी जाऊन जेवता येईल. पण त्यांचं लग्न जर बाहेर कुठे झालं तर त्यांचे आई-वडीलही त्याच ठिकाणी शिफ्ट होतील अशी त्यांची अट आहे.
एका मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीत जया किशोरी म्हणाल्या की, ती खूप घबरल्या. कारण मुलगी असल्याने त्यांना एक दिवस घर सोडावे लागणार आहे. जया किशोरी पुढे म्हणतात की, आई-वडिलांशिवाय त्या आपल्या आयुष्याचा विचारच करू शकत नाही.