बंगळुरातल्या कृषी मेळाव्यात दांडग्या ‘कृष्णा’ची कमाल, 1 कोटींच्या बोलीने मालक मालामाल, देशी गोवंशाची किंमत डोकं चक्रावणारी!
बंगळुरुतला हा कृषी मेळावा 4 दिवस चालणार आहे. दरवर्षी हा मेळावा कुठल्या ना कुठल्या कारणाने चर्चेत राहतो. यंदा कोट्यवधींच्या कृष्णानं हा मेळावा गाजवला आहे. कृष्णा हा हल्लीकर जातीचा बैल आहे.
बंगळुरु: कर्नाटकात एका बैलावर तब्बल 1 कोटींची बोली लागली आहे. कृष्णा असं या बैलाचं नाव असून बेंगळुरुतल्या कृषी मेळाव्यात हा बैल विक्रीसाठी आणण्यात आला आहे. मालकाच्या म्हणण्यानुसार, या बैलाच्या सिमेनला शेतकऱ्यांमध्ये खूप मागणी आहे. या बैलाच्या वीर्याचा एक डोस तब्बल 1 हजार रुपयांना विकला जातो. त्यामुळे या मेळाव्यात हा बैल आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतो आहे. लोकांनी त्याच्यासोबत भरपूर सेल्फी काढले. (native cattle Krishna Bull Sold for 1 crore in Krishi Mela Bengaluru 2021 know its specialty India Farming )
देशी गोवंशाला शेतकऱ्यांमध्ये मोठी मागणी
बंगळुरुतला हा कृषी मेळावा 4 दिवस चालणार आहे. दरवर्षी हा मेळावा कुठल्या ना कुठल्या कारणाने चर्चेत राहतो. यंदा कोट्यवधींच्या कृष्णानं हा मेळावा गाजवला आहे. कृष्णा हा हल्लीकर जातीचा बैल आहे. ज्याचं वीर्य खूप महाग आहे. सध्या शहरांमध्ये म्हशी आणि जर्शी गायींपेक्षा देशी गायींच्या दुधाला जास्त मागणी आहे. कृष्णा हा सुद्धा एक देशी गोवंश आहे. याच्यामध्ये कुठलंही मिश्रण नाही. त्यामुळेच याचं वीर्य शेतकरी हजारो रुपये देऊन विकत आहे. देशी गायींपासून A2 पद्धतीचं दूध मिळतं, जे दूध शहरांमध्ये 120 ते 150 रुपये लीटरपर्यंत विकलं जातं.
A 3.5 yr old bull named Krishna, valued at around Rs 1 Cr, has become centre of attraction at Krishi Mela in Bengaluru
Hallikar breed is mother of all cattle breeds. Semen of this breed is in high demand & we sell a dose of the semen at Rs 1000, said Boregowda, the bull owner pic.twitter.com/5cWZ5RW1Ic
— ANI (@ANI) November 14, 2021
बोली 1 कोटींवर कशी पोहचली?
कृष्णा ज्या प्रजातीचा आहे, ती प्रजाती संपत चालली आहे. त्यामुळे देशी गोवंश वाढवण्याचा प्रयत्न कृष्णाचे मालक बोरेगौडा यांचा आहे. त्यातच हा बैल बाजारात आल्याने व्यापाऱ्यांची नजरही त्याच्यावर पडली, आणि लागलेली बोली तब्बल 1 कोटींवर जाऊन पोहचली.
अवघ्या साडेतीन वर्षाचा कृष्णा
विशेष गोष्ट म्हणजे, कृष्णा अवघ्या साडेतीन वर्षांचा आहे. मात्र जिथं इतर दांडगे बैल 2 ते 3 लाखांना विकले जातात, तिथं कृष्णाची किंमत तब्बल कोट्यवधींवर जाऊन पोहचली आहे. या मेळाव्यात आतापर्यंत लागलेली ही सर्वाधिक बोली आहे. या बैलाचं वजन 800 ते 1 हजार किलोपर्यंत जाऊ शकतं. याची लांबी साडेसहा ते 8 फुटांपर्यंत असते. योग्य काळजी घेतली तर याचं आयुष्य 20 वर्षांहून जास्त असल्याचं कृष्णाचे मालक सांगतात.
हा मेळावा 4 दिवस चालणार आहे. मात्र, मेळाव्याच्या पहिल्याच दिवशी 60 हजारहून अधिक लोकांनी हजेरी लावली. तर दुसऱ्या दिवशी 1 लाख 10 हजाराहून अधिक लोक पोहचले. बंगळुरुतल्या GKVK कॅम्पसमध्ये हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. ज्यामध्ये हा बैल लोकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला.
हेही पाहा:
मुलगा कासव समजून नाल्यातल्या प्राण्याशी खेळत होता, पण जेव्हा खरं समोर आलं, तेव्हा सगळेच हादरले!
Video: बीचवर फिरणारा हा प्राणी खरंच गॉडझिला आहे? जाणून घ्या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओतील प्राणी कोणता?