सोनेरी नीरजचं मोदींबद्दलचं ‘ते’ ट्विट 2 वर्षानंतर लोकांच्या हाती लागलंच, ज्यात तो म्हणाला होता……

लोकसभा निवडणुकीत 2019 साली भाजपने 303 जागा मिळवून नवा विक्रम प्रस्थापित केला. यावेळी तमाम लोकांनी मोदींवर शब्दसुमनांची उधळ करत त्यांच्या दुसऱ्या टर्मला शुभेच्छा दिल्या. नीरज तरी कसा मागे राहणार होता...?

सोनेरी नीरजचं मोदींबद्दलचं 'ते' ट्विट 2 वर्षानंतर लोकांच्या हाती लागलंच, ज्यात तो म्हणाला होता......
पंतप्रधान मोदी आणि नीरज चोप्रा
Follow us
| Updated on: Aug 08, 2021 | 1:33 PM

मुंबई : टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये 87.58 मीटर भाला फेकून स्पर्धेतलं ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकणाऱ्या नीरज चोप्राचं (Neeraj Chopra) कौतुक करायला देशवासियांना शब्द अपुरे पडतायत. देशाला मैदानी खेळांमधलं पहिलं वैयक्तिक सुवर्णपदक जिंकून देणाऱ्या नीरज चोप्राने काल इतिहास रचलाय. नीरजने सुवर्णपदकासोबत देशाचा गौरव वाढवला आहे. कोट्यवधी देशवासियांची मनं त्याने जिंकली आहेत. याच पार्श्वभूमीवर आता नेटकरी नीरजसंबंधी विविध माहिती नेटवर सर्च करत आहे. नीरज कुठला आहे, त्याची पार्श्वभूमी काय आहे, अशा प्रकारची माहिती नेटकरी घेत आहेत. याचवेळी नेटकऱ्यांच्या हाती नीरजचं एक ट्विट लागलंय, जे ट्विट भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासंबंधी आहे.

नीरजचं मोदींबद्दलचं ट्विट

लोकसभा निवडणुकीत 2019 साली भाजपने 303 जागा मिळवून नवा विक्रम प्रस्थापित केला. यावेळी तमाम लोकांनी मोदींवर शब्दसुमनांची उधळ करत त्यांच्या दुसऱ्या टर्मला शुभेच्छा दिल्या. नीरज तरी कसा मागे राहणार होता…? त्यानेही मोदींना ट्विटरच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या होत्या.

2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने मिळविलेल्या ऐतिहासिक विजयाबद्दल नीरजने ट्विटरवरुन अभिनंदन केलं आहे. “ऐतिहासिक विजयासाठी आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन. तुमच्या नेतृत्वाखाली आपल्या देशाने नवीन उच्चांक गाठावेत, अशी इच्छा नीरजने आपल्या ट्विटमधून व्यक्त केली होती.

Neeraj Tweet About Pm Modi

नीरजचं मोदींबद्दलचं ट्विट…

नीरजचा सुवर्णवेध, भारताचं पहिलं सुवर्ण पदक

भारताचा स्टार खेळाडू नीरज चोप्रा (Neeraj Chopra) याच्या खेळाकडं भारताच्या नजरा लागल्या होत्या. करोडो भारतीयांचं स्वप्न नीरजनं पूर्ण करत टोकियो ऑलम्पिकमधील पहिलं सुवर्ण पदक भारताला मिळवून दिलं आहे. पहिल्या फेरीत त्याने 87.03 मीटर लांब भाला फेक करत आघाडी मिळवली. नीरज चोप्रा भारताला यंदाच्या ऑलंम्पिकमध्ये सुवर्ण पदक मिळवून देतो का याकडं सर्वांच लक्ष लागलं होतं, अखेर कोट्यवधी भारतीयांचं स्वप्न नीरज चोप्राने पूर्ण केलं आहे.

नीरजची पार्श्वभूमी काय?

नीरजचा जन्म 27 डिसेंबर 1997 ला हरयाणाच्या पानिपत जिल्ह्यातल्या खांद्रा गावात एका शेतकरी कुटुंबात झाला. चंदीगडमधून शिक्षण पूर्ण केल्यानंतर भालाफेक या खेळाची कोणतीही पार्श्वभूमी त्याच्या गावात नव्हती. तरी जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर त्याने हा खेळ शिकला आणि आज खेळातील सर्वोच्च मान मिळवला. पण पानिपत जिल्ह्यातील हा नीरज त्याच मराठ्यांपैकी एक आहे. जे पानीपतच्या युद्धानंतर तेथील आसपासच्या गावांमध्ये स्थायिक झाले होते. तिथे राहताना अधिक अडचणी येऊ नयेत म्हणून तेथील एक राजा रोड याच्या नावाची मदत घेत ते ‘रोड मराठा’ असं स्वत:ला म्हणवून घेऊ लागले.  विशेष म्हणजे 2016 साली भारतात झालेल्या दक्षिण आशियाई खेळांमध्ये नीरजने सुवर्णपदक पटकावल्यानंतर एका इंग्रंजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत आपण रोड मराठा असून आपल्याला त्याचा अभिमान असल्याचं त्यानं म्हटलं होतं.

(Neeraj Chopra tweet About Pm Modi Goes Viral on Social Media)

हे ही वाचा :

सोनेरी भालाफेक करणाऱ्या नीरज चोप्राचं ‘मराठा’ कनेक्शन माहित आहे का? भालाफेक तर रक्तात

सुवर्णपदक विजेत्या नीरज चोप्रावर बक्षिसांचा वर्षाव, कोट्यवधीच्या रोख रकमेसह गाडी आणि बरंच काही

Video: जेव्हा टोकियोच्या मैदानावर तिरंगा फडकला, राष्ट्रगीतानं मैदान दुमदुमलं, पहा गोल्डन बॉय नीरजचा भावूक क्षण

Neeraj Chopra Profile : वय अवघं 23, कोरोनाची बाधा, तरीही बधला नाही, सुवर्ण जिंकणाऱ्या नीरज चोप्राची कहाणी!

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.