Video: नेटफ्लिक्सचे प्लान आता स्वस्त, 499 चा प्लान 199 ला, नेटकऱ्यांकडून सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस!
आधी ज्या प्लानसाठी दरमहा 199 रुपये भरावे लागायचे, तिथं आता यूजर्सला मोबाईल प्लॅनसाठी महिन्याला फक्त 149 रुपये मोजावे लागतील. प्रत्येकजण ही बातमी जाणून खूप आनंदीत आहे आणि मीम्सद्वारे त्यांची प्रतिक्रिया शेअर करत आहे.
सध्याच्या काळात नेटफ्लिक्सवरील वेब सीरिज पाहणारे शोधून सापडत नाही. तरुणाईला NetFlix ने अक्षरष: वेड लावलं आहे. मात्र, नेटफ्लिक्सचे महागडे प्लान पाहता, अनेकजण यावरील वेबसीरिज इंटरनेटवरुन डाऊनलोड करण्याचा म्हणजेच पायरसीचा ट्रेंड वाढला होता. मात्र, एकीकडे मोबाईल कंपन्यांनी रिचार्जचा रेट वाढवले असताना, दुसरीकडे नेटफ्लिक्सचे दर कमी झाले आहेत. बरं असे तसे नाही तर या दरांमध्ये घसघशीत कपात करण्यात आली आहे. यामुळेच नेटफ्लिक्स सध्या सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे. नेटकरी यावर वेगवेगळे मिम्स बनवत आहेत. (Netflix india trends after cost cutting social media flooded with Funny memes users are happy)
आधी ज्या प्लानसाठी दरमहा 199 रुपये भरावे लागायचे, तिथं आता यूजर्सला मोबाईल प्लॅनसाठी महिन्याला फक्त 149 रुपये मोजावे लागतील. प्रत्येकजण ही बातमी जाणून खूप आनंदीत आहे आणि मीम्सद्वारे त्यांची प्रतिक्रिया शेअर करत आहे.
आम्ही तुम्हाला सांगतो की, रिपोर्टनुसार, जे लोक अधिक डिव्हाइसेसवर नेटफ्लिक्स वापरतात, त्यांना आधी 499 रुपये महिन्याला मोजावे लागत होते, त्या युजर्सना आता फक्त 199 रुपये प्रति महिना भरावे लागतील. जर आपण स्टँडर्ड नेटफ्लिक्स प्लानच्या किंमतीबद्दल बोलायचं झालं, तर ते 649 रुपयांऐवजी 499 रुपये प्रति महिना असेल. त्याच वेळी, प्रीमियम प्लॅनची किंमत 799 रुपयांवरून 649 रुपये प्रति महिना झाली आहे. ही बातमी कळल्यावर तुम्हा सर्वांना खूप आनंद होईल याची आम्हाला खात्री आहे.
Netflix ने काढलेल्या सर्व नवीन किमती आज म्हणजेच 15-12-2021 पासून लागू करण्यात आल्या आहेत. आता नेटफ्लिक्सने सबस्क्रिप्शनच्या किंमती कमी केल्यानंतर, लोकांनी सोशल मीडियावर मीम्सचा पूर आला आहे. लोक त्यांच्या मजेदार पद्धतीने नेटफ्लिक्सचे आभार मानत आहेत. चला त्या मीम्सवर एक नजर टाकूया.
Price hike k zamaane me ye log price cut kar rahe hein ?? pic.twitter.com/eUpv1N2z4A
— Bilal Mulla بلال (@bilalmulla74) December 14, 2021
We hope we make your week, your months and your year too ? pic.twitter.com/38K0jM4G20
— Netflix India (@NetflixIndia) December 14, 2021
Targeting sasta market means sasta content incoming…? pic.twitter.com/U2lUD10R68
— Not yer da (@notyerda) December 14, 2021
Nope, this is not a limited period offer. These are the Happy New Prices! pic.twitter.com/4DCL73egeS
— Netflix India (@NetflixIndia) December 14, 2021
हेही पाहा: