मुलांमध्ये कधीही भेदभाव करू नका, आपल्या वागण्यातून काय संदेश देतेय ही चिमुरडी? Video viral
Kid emotional video : एक गोड व्हिडिओ सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral) झाला आहे. हा एक भावुक (Emotional) करणारा व्हिडिओ आहे. यातून एक मेसेज देण्यात आलाय. लहान मुले निष्पाप असतात. त्यांच्यावर आपण प्रेमच करायला हवं, असा हा संदेश आहे.
Kid emotional video : सोशल मीडियावर लहान मुलांचे व्हिडिओ म्हणजे हमखास व्हायरल होणारा कंटेंट. त्यात जर काही विनोदी असेल तर लोकांना तो खूप आवडतो. तर काही भावनिक व्हिडिओही असतात. अशा व्हिडिओंमधून काहीतरी संदेश देण्याचा प्रयत्न असतो. आता असाच एक गोड व्हिडिओ सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral) झाला आहे. हा एक भावुक (Emotional) करणारा व्हिडिओ आहे. यातून एक मेसेज देण्यात आलाय. लहान मुले निष्पाप असतात. त्यांच्यावर आपण प्रेमच करायला हवं. आपली मुलगी तशीच दुसऱ्यांची… त्यांच्याच अंतर ठेवू नये. भेदभाव करू नये. त्यांना न रागावता चांगली वागणूक दिली पाहिजे असं यातून सांगितलंय. दोन मुली मात्र दोघींनाही वेगवेगळी वागणूक असं व्हिडिओत दाखवलंय. व्हायरल व्हिडिओमधल्या चिमुरडीनं यासंबंधी एक मेसेज दिलाय. तो आपल्याला भावेल.
चिमुरडी सगळं ऐकते
व्हिडिओमध्ये एक चिमुरडी आणि तिचा पुतण्या दाखवलाय. चिमुरडीचे आई-वडिल जगात नसतात. अशावेळी काका तिचा सांभाळ करतात. पण काकांचा मुलगा त्यात दाखवलाय. तो या चिमुरडीला सतत रागवत असतो. काम करायला लावतो. ती चिमुरडीही काही न बोलता काम करत असते. तर स्वत:च्या मुलीला मात्र चांगलं वागवतो. या मुलाला एक फोन येतो. समोरची व्यक्ती त्याला हफ्त्याची आठवण करून देते. मात्र या मुलाकडे पैसे नसतात. हे सर्व ती चिमुरडी ऐकते आणि या मुलाजवळ येवून त्याला दिलासा देते. काय म्हणते ती चिमुरडी आपल्या भावाला. व्हिडिओ पाहिल्यानंतर चिमुरडीचा संदेश आपल्याला कळेल.
यूट्यूबवर अपलोड
यूट्यूबवर शादाब फाइव्ह स्टार (shadab5star) या चॅनेलवर हा व्हिडिओ अपलोड करण्यात आलाय. 20 फेब्रुवारीला अपलोड केलेल्या या व्हिडिओला 4.2 मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. त्यात वाढच होत आहे. ‘Baccho me kabhi farak mat karo’ असं कॅप्शन व्हिडिओला देण्यात आलंय. यूझर्सना हा व्हिडिओ आवडलाय. ते लाइक करून कौतुकही करत आहेत. (Video courtesy – shadab5star)