Snake & Frog : …अन् धोकादायक सापाच्या तावडीतून सुटतो बेडून, लोकांनी हिंमतीला दिली दाद

Snake & Frog : एका गेटवर चढणाऱ्या बेडकाचा (Frog) पाय एका धोकादायक काळा सापाने (Snake) पकडून ठेवल्याचे व्हिडिओमध्ये (Video) दिसत आहे. बेडूक स्वतःला सापापासून मुक्त करण्याचा प्रयत्न करत असताना साप बेडकाला गिळण्याचा प्रयत्न करत असताना दिसत आहे.

Snake & Frog : ...अन् धोकादायक सापाच्या तावडीतून सुटतो बेडून, लोकांनी हिंमतीला दिली दाद
बेडकाला गिळण्याचा प्रयत्न करतान सापImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Apr 03, 2022 | 2:01 PM

Snake & Frog : साप हा जगातील सर्वात विषारी प्राण्यांपैकी एक आहे. सापाला पाहून भल्याभल्यांचा थरकाप उडतो. साप बेडकांना जिवंत गिळत असल्याचे तुम्ही अनेकदा पाहिले असेल. अनेकदा माणसांना सापांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला जातो. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हीही म्हणाल, की आयुष्यात कधीही हार मानू नये. एका गेटवर चढणाऱ्या बेडकाचा (Frog) पाय एका धोकादायक काळा सापाने (Snake) पकडून ठेवल्याचे व्हिडिओमध्ये (Video) दिसत आहे. बेडूक स्वतःला सापापासून मुक्त करण्याचा प्रयत्न करत असताना साप बेडकाला जिवंत गिळण्याचा प्रयत्न करत असताना असे हे चित्र दिसत आहे. आपण पाहू शकता, की सापाने बेडकाचा पाय घट्ट पकडला आहे. खूप प्रयत्नांनंतर शेवटी बेडूक स्वतःला सापाच्या तावडीतून मुक्त करण्यात यशस्वी होतो. यानंतर तो उडी मारून तेथून पळून जातो.

वेगात धावतो बेडूक

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की बेडूक इतक्या वेगाने धावतो, की साप त्याला पुन्हा पकडू शकत नाही. सापसुद्धा आपला पाठलाग इतक्या सहजासहजी सोडू इच्छित नाही. म्हणूनच तोही गेटवरून झटपट खाली येतो आणि बेडकाच्या दिशेने वेगाने सरकतो. इथेच व्हिडिओ संपतो. त्यामुळे सापाने बेडकाची पुन्हा शिकार केली, की बेडूक स्वतःला वाचवण्यात यशस्वी झाला की नाही हे कळू शकले नाही.

ट्विटर हँडलवर शेअर

हा व्हिडिओ IFS अधिकारी सुशांत नंदा यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर शेअर केला आहे. यासोबत त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले, की कधीही हार मानू नका. हा व्हिडिओ इतका जबरदस्त आहे, की तो आतापर्यंत 67 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. व्हिडिओ पाहून लोक वेगवेगळ्या कमेंट करत आहेत. व्हिडिओ पाहून एका यूझरने ‘जे प्रयत्न करतात ते कधीही हार मानत नाहीत’, अशी कमेंट केली.

आणखी वाचा :

…अखेर गळाला लागलाच! मासे पकडण्यासाठी काय अफलातून युक्ती केलीय चिमुरड्यानं! ‘हा’ Jugaad video पाहाच

एकट्या सिंहिणीवर तुटून पडतो तरसांचा कळप, पण नंतर घडतं भलतंच; Wild video viral

Chinese robotic dog : भयाण शांतता… रस्त्यावर चिटपाखरुही नाही, अशा निर्मनुष्य रस्त्यांवर काय करतोय ‘हा’ कुत्रा?

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.