या बाळाचा संघर्ष अंगावर काटा आणणारा, 17 मिनिटे श्वासोच्छवास बंद, संघर्ष करून जगला!
गर्भावस्थेच्या 26 आठवड्यांनंतरच बाळाचा जन्म झाला आणि जेव्हा बाळाचा जन्म झाला तेव्हा त्याचा श्वास बंद झाला होता.
ब्रिटनमधील काही डॉक्टरांनी 17 मिनिटे ज्या बालकाचा श्वासोच्छवास बंद होता, त्या बालकाचा जीव वाचलाय. हा एक चमत्कार आहे कारण हे नवजात बालक वाचेल अशी आशा डॉक्टरांनी सुद्धा सोडली होती. या बाळाचा संघर्ष अंगावर काटा आणणारा आहे. नीट होण्यासाठी या बाळाला तीन महिने हॉस्पिटलमध्ये राहावं लागलं. ते म्हणतात ना “जाको राखे साइयां मार सके ना कोय” बस चमत्कार झाला!
ही घटना ब्रिटनमधील रुग्णालयातील आहे. ‘द मिरर’च्या वृत्तानुसार, गर्भावस्थेच्या 26 आठवड्यांनंतरच बाळाचा जन्म झाला आणि जेव्हा बाळाचा जन्म झाला तेव्हा त्याचा श्वास बंद झाला होता.
हे बाळ शस्त्रक्रियेद्वारे जन्माला आलं. जन्माला आलेल्या या अकाली बाळाचा श्वास 17 मिनिटे बंद झाला. काही डॉक्टरांनीही आशा सोडली होती आणि कुटुंबातील सदस्यांची अवस्था वाईट झाली होती.
बाळाच्या कुटुंबियांना त्याला घरी नेता आले नाही. उपचार सुरू झाला. उपचारादरम्यान या बाळाला हॉस्पिटलच्या लॅबमध्ये नेण्यात आलं. उपचार सुरु झाल्यावर चमत्कार घडला. हे बाळ श्वास घेऊ लागलं. आता हे मूल तीन महिन्यांनंतर बरे होऊन घरी परतले आहे.
रिपोर्टनुसार, जन्माच्या वेळी बाळाचे वजन 750 ग्रॅम होते. 17 मिनिटे त्यांचा श्वास थांबला. यानंतर त्यांनी श्वास घेण्यास सुरुवात केली.
त्याला जिवंत ठेवण्यासाठी रक्त चढविण्यात आलं. स्कॅनमध्ये त्याच्या मेंदूला कोणतीही हानी झाली नसल्याचे समोर आले. रुग्णालयात 112 दिवस राहिल्यानंतर हे बाळ आता ऑक्सिजनवर घरी आलंय.