ट्राफिक पासून वाचण्यासाठी रिक्षावाल्याने काय पराक्रम केले ते तर बघा, व्हिडीओ व्हायरल
दिल्ली मध्ये सध्या G-20 परिषदेची पूर्ण झालीये. पण इथे सामान्य नागरिकांचे हाल होतायत. एक व्हिडीओ व्हायरल होतोय ज्यात एक रिक्षा चालक पायऱ्यांवरून रिक्षा चालवत नेतोय. हा व्हिडीओ बघताना तुम्हाला धक्का बसेल. हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झालाय.
नवी दिल्ली: सगळे प्रॉब्लेम एकीकडे आणि ट्राफिकचे प्रॉब्लेम एकीकडे. दिल्ली मध्ये G-20 संमेलनाची तयारी पूर्ण झालेली आहे. येणाऱ्या पाहुण्यांचं स्वागत जोरदार केलं जाणारे. पण या परिषदेची तयारी सुरु असताना सामान्य नागरिकांचे हाल होतायत. दिल्लीत सध्या रस्त्यांवर दूर दूर पर्यंत रांगा लागतायत. एखाद्या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहचण्यासाठी तासंतास लागतायत. लोकं या परिस्थितीला अक्षरशः कंटाळलीत. मग आता या ट्राफिक मधून मार्ग काढणार कसा? यावर एका रिक्षाचालकाने एक शक्कल लढवली.
रिक्षा पायऱ्यांवरून वर चालली आहे
हा व्हिडीओ बघताना तुमच्या अंगावर काटा येईल. या व्हिडीओ मध्ये एक रिक्षा पायऱ्यांवरून वर चालली आहे. रस्त्यावरून न जाता ही रिक्षा एका फुटओवर ब्रिजवरून जाताना दिसतेय. हा व्हिडीओ दिल्लीच्या हमदर्दनगर मधला असल्याचं बोललं जातंय. या रिक्षा वाल्याने ट्राफिकला चांगलंच हरवलं आहे म्हणायचं.
View this post on Instagram
व्हिडीओ प्रचंड व्हायरल
व्हिडीओ बघताना आपल्याला सुद्धा धक्का बसतो. एक फुटओवर ब्रिज आणि त्यावरून एक रिक्षा अशी भर्रकन वर जाते. इतक्या पायऱ्या असताना सुद्धा तो चालक कसलाही विचार न करता त्याची रिक्षा त्या पायऱ्यांवरून चढवतो. रिक्षा जरा पुढे गेली की मागून एक माणूस धावत जाऊन तिच्यात बसतो. मग काय? रिक्षा काय थांबायचं नाव घेत नाही. रिक्षा सरळ वर चढते. बघणारे बघतच बसतात. हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झालाय.