नैसर्गिक आपत्तींमध्ये भूकंप असे असतात की, कोणताही अंदाज किंवा अलर्ट आधीच जारी करता येत नाही. जगातील विविध देशांमध्ये यामुळे झालेले नुकसान आपण वेळोवेळी पाहिले आहे. भूकंप खूप तीव्र असेल आणि तुम्ही एखाद्या इमारतीच्या आत असाल, तर त्यातून सुटण्याची शक्यता फारच कमी असते, पण ही सर्व आव्हाने लक्षात घेऊन अभियंत्यांनी एक आश्चर्यकारक तंत्रज्ञान आणले आहे. या तंत्रज्ञानामुळे भूकंपामुळे तुमचे नुकसान होऊ शकत नाही. हे सर्व एका अनोख्या पलंगाने शक्य होईल. होय हे पलंग असे आहे जे धोका आल्यावर आपोआप बंकरमध्ये रूपांतरित होते. हा अप्रतिम बेड पाहून तुम्हीही थक्क व्हाल.
आपण ज्या तंत्रज्ञानाबद्दल बोलत आहोत, ते एका व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत आहे. भूकंप झाला की हा पलंग आपोआप बंकरमध्ये बदलतो. ते इतकं मजबूत असतं की, त्यावर झोपलेल्या व्यक्तीला काहीही होत नाही, हे यात स्पष्ट करण्यात आले आहे.
इतकंच नाही तर बेड बंकर झाल्यावर त्या माणसाला जगण्यासाठी आवश्यक असलेला ऑक्सिजन आणि इतर आवश्यक गोष्टी मिळणार आहेत. अशा प्रकारे तुम्ही ह्यात दीर्घकाळ जिवंत राहू शकता.
व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की, एक बेड आहे ज्यावर एक माणूस झोपला आहे. अचानक भूकंप होतो आणि बेडवर झोपलेल्या व्यक्तीला काहीच कळत नाही, असं ॲनिमेशनवरून दिसून येतं.
जेव्हा भूकंप तीव्र असतो तेव्हा इमारत कोसळू लागते, तेव्हा त्याचा ढिगारा बेडवर झोपलेल्या माणसावर पडू लागताच पलंग आपोआप दुमडतो आणि डब्याचे रूप धारण करतो.
earthquake bed pic.twitter.com/cjbFZSA3Xl
— Great Videos (@Enezator) December 7, 2022
डबा बनवण्याआधी तो झोपलेल्या व्यक्तीला आत ढकलतो. या बॉक्समध्ये पाणी, जेवण आणि मेडिकल किट इत्यादी गोष्टींची व्यवस्था यापूर्वीच करण्यात आली आहे.
आतापर्यंत हा व्हिडिओ 15 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. या व्हिडिओवर मोठ्या संख्येने लोक कमेंटही करत आहेत.