Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PCS Jyoti Maurya News : ज्योती मौर्य प्रकरणात नवा ट्विस्ट, कमांडंट मनीष दुबे यांची नोकरी धोक्यात, तपास सुरू

महिला पीसीएस अधिकारी यांचे पती आलोक मौर्य यांनी त्यांच्या पत्नीवर गंभीर आरोप केला आहे. ते म्हणतात की, 'मनीष दुबे आणि त्यांच्या पत्नीने त्यांची हत्या करण्याचा कट रचला होता.

PCS Jyoti Maurya News : ज्योती मौर्य प्रकरणात नवा ट्विस्ट, कमांडंट मनीष दुबे यांची नोकरी धोक्यात, तपास सुरू
PCS Jyoti Maurya NewsImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jul 04, 2023 | 1:42 PM

मुंबई : उत्तरप्रदेश राज्यातील बरेलीमधील पीसीएस अधिकारी ज्योति मौर्य (PCS Jyoti Maurya) सध्या सोशल मीडियावर अधिक चर्चेत आहे. विशेष म्हणजे ज्योति मौर्य (jyoti maurya call recording) एसडीएम झाल्यानंतर इतर व्यक्तीसोबत पळून गेल्याचा आरोप त्यांच्या पतीने केला आहे. त्याचबरोबर त्यांच्या पतीने आणखी एक गंभीर आरोप केला आहे, ‘ज्योति मौर्य आणि त्यांच्या प्रियकराने (viral news in marathi) मिळून त्यांची हत्या कऱण्याचा प्रयत्न केला आहे. या सगळ्या प्रकरणाची सध्या चौकशी सुरु आहे. या सगळ्याची चौकशी झाल्यानंतर आलोक यांनी केलेल्या आरोपात किती तथ्य आहे हे उजेडात येईल.

ज्योती मौर्य यांचं कॉल रेकॉर्डींग या आठवड्यात येणार होतं. परंतु सध्या अनेक जिल्हा कमांडंटच्या बदल्या झाल्यामुळे कॉल रेकॉर्डिंगला यायला उशीर झाला आहे. त्याचबरोबर आता पुढच्या आठवड्यात कॉल रेकॉर्डींग येणार आहे. या संदर्भात डीजीपी होमगार्ड विजय कुमार मौर्य यांनी एक प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणतात की, ‘या संपूर्ण प्रकरणाची चौकशी डीआयजी संतोष कुमार यांनी लवकरात लवकर करावी असे आदेश दिले आहेत.’

महिला पीसीएस अधिकारी यांचे पती आलोक मौर्य यांनी त्यांच्या पत्नीवर गंभीर आरोप केला आहे. ते म्हणतात की, ‘मनीष दुबे आणि त्यांच्या पत्नीने त्यांची हत्या करण्याचा कट रचला होता. या प्रकरणात आलोक यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे न्याय मागितला आहे. त्यांनी असं म्हटलं आहे की, त्यांनी पत्नी आणि मनीष दुबे मागच्या तीन वर्षापासून एकमेकांच्या संपर्कात आहेत.’ मोबाईलवरती झालेलं व्हाट्सअप्प चॅटिंग सुध्दा व्हायरल झालं होतं.

हे सुद्धा वाचा

मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून आदेश मिळाल्यानंतर, होमगार्ड मुख्यालयाकडून प्रयागराजमध्ये तैनात डीआईजी प्रकरणात चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. सगळ्या चौकशीचा अहवाल या आठवड्यात येणार होता. डीजीपीनी सुध्दा सांगितलं आहे की, सध्या त्या प्रकरणातील अहवाल येण्याची आम्ही वाट पाहत आहोत. त्याचबरोबर चौकशी अधिकाऱ्याला लवकरात लवकर अहवाल तयार करण्याचे आदेश वरिष्ठांनी दिले आहेत.

साईबाबांच्या पालखी सोहळ्यात आदित्य ठाकरेंना ढोल वाजवण्याचा मोह अनावर
साईबाबांच्या पालखी सोहळ्यात आदित्य ठाकरेंना ढोल वाजवण्याचा मोह अनावर.
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यानिमित्त नागपूरात जोरदार बॅनरबाजी
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यानिमित्त नागपूरात जोरदार बॅनरबाजी.
महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात...
महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात....
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य.
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले.
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य.
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया.
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर...
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर.....
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत.