पातेल्यात झोपवून बाळाला पोलिओ डोससाठी आणलं, कारण ऐकून तुम्हीही या पित्याचं कौतुक कराल!

असाच एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा फोटो पाहून तुम्हाला आधी थोडं विचित्र वाटेल, पण यामागची कहाणी ऐकल्यानंतर तुम्हालाही सुखद धक्का बसेल. या फोटोमध्ये आरोग्य कर्मचारी नवजात बालकाला पोलिओ डोस देत आहे. आणि हे तान्हं बाळ एका पातेल्यात ठेवण्यात आलं आहे.

पातेल्यात झोपवून बाळाला पोलिओ डोससाठी आणलं, कारण ऐकून तुम्हीही या पित्याचं कौतुक कराल!
या फोटोत तुम्ही एका नवजात बाळाला एका भांड्यात ठेवलेलं पाहू शकता.
Follow us
| Updated on: Oct 01, 2021 | 1:08 PM

सोशल मीडियावर तुम्हाला कधी काय पाहायला मिळेल सांगता येत नाही. काही गोष्टी अशा असतात, ज्या तुमच्या हृदयात नेहमीच्या कोरल्या जातात. असाच एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा फोटो पाहून तुम्हाला आधी थोडं विचित्र वाटेल, पण यामागची कहाणी ऐकल्यानंतर तुम्हालाही सुखद धक्का बसेल. या फोटोमध्ये आरोग्य कर्मचारी नवजात बालकाला पोलिओ डोस देत आहे. आणि हे तान्हं बाळ एका पातेल्यात ठेवण्यात आलं आहे. (newborn-baby-floating-in-cooking-pot-for-polio-dose-in-west-bengal-see-viral-photo-sundarban)

भारतात अजूनही पोलिओ अभियान मोठ्या प्रमाणावर केलं जातं. प्रत्येक तान्ह्या बाळापर्यंत पोहचण्याचा आरोग्य कर्मचाऱ्यांचा प्रयत्न सुरु असतो. एकही मुलगा सुटू नये हा आरोग्य विभागााचा प्रयत्न आहे. यासाठीच आरोग्य कर्मचारी ऊन, वारा, पाऊस आणि पूर या सर्व परिस्थितींशी लढा देत ते घरोघरी लोकांपर्यंत पोहोचतात आणि त्यांना जीवनाचे दोन थेंब म्हणजेच पोलिओ डोस देत असतात. आताचा व्हायरल होणारा हा फोटो पश्चिम बंगालमधील सुंदरबनमधील असल्याचं सांगितलं जात आहे, जिथं हे आरोग्य कर्मचारी पुरात अडकलेल्या बाळांनाही पोलिओचा डोस देत आहेत. या फोटोत तुम्ही एका नवजात बाळाला एका भांड्यात ठेवलेलं पाहू शकता.

पाहा फोटो:

हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, आधी लोकांना कळालंच नाही की या बाळाला पातेल्यात का ठेवलं. तर याचं कारण आहे या बाळाची आई. बाळाच्या आईची तब्येत खराब असल्याने आणि पुराने वेढा दिल्याने ती बाळाला पोलिओ डोस देण्यासाठी घेऊ येऊ शकत नव्हती. दुसऱ्या बाजूला या बाळाच्या वडिलांना बाळ तान्हं असल्यानं त्याला हाताळणं अवघड वाटत होतं. शेवटी ज्या प्रमाणे कृष्णाला नदी पार करण्यासाठी वसुदेवाने जशी टोपल्यात घेऊन नदी पार केली होती, त्याच प्रमाणे या पित्याने मुलाला या पातेल्यात बसवलं आणि पोलिओ डोस देण्यासाठी आणलं.

दिल्ली एम्सचे डॉक्टर योगीराज राय dIddocYogiraj यांनी हा फोटो शेअर केला आहे. फोटो शेअर करत त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले, ‘गंगेच्या डेल्टा सुंदरबनमध्ये पल्स पोलिओ लसीकरण. आरोग्य सेवा कर्मचारी एवढ्या पुरातही भागात अथक परिश्रम घेत आहे. ट्विटर युजर @skbadiruddin च्या मते, हा फोटो रविवारचा असून सिंघेश्वर गावात काढण्यात आला आला. या बाळाच्या आईला पुराच्या पाण्यात चालता येत नव्हते. अशा परिस्थितीत, नवजात मुलाला पोलिओ डोस देण्यासाठी, वडिलांनी मुलाला पातेल्यात ठेवलं आणि डोस देण्यासाठी पोहचले.

हेही पाहा:

Video: खारुताईचा चालाखी पाहून थक्क व्हाल, असा व्हिडीओ जो पाहून नेटकरी खारुताईच्या प्रेमात पडले!

Video: बाईकवर स्टंट करण्याचा प्रयत्न, पाय सटकला आणि महाशयांचं तोंड फुटलं, व्हिडीओ व्हायरल

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.