जुळी मुलं! वेळ वेगळी, दिवस वेगळे, वर्षं वेगळे… कसं? असं!
एकाचा जन्म 2022 मध्ये झाला आणि दुसरा 2023 मध्ये जन्माला आला. ही जुळी मुले पूर्णपणे निरोगी आहेत.
कोणत्याही पालकांसाठी मुलाचा जन्म हा कदाचित त्यांच्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा क्षण असतो. पण जुळ्या मुलांचा जन्म हा एक वेगळाच मुद्दा असतो. अलीकडेच एका महिलेने जुळ्या मुलांना जन्म दिला तेव्हा एक अतिशय रंजक बाब समोर आली. ही गोष्ट खूप आश्चर्याची आणि विचार करायला लावणारी आहे कारण या जुळ्या मुलांच्या जन्माचं वर्ष आणि वेळ वेगवेगळी आहे.
अमेरिकेतील टेक्सास शहरात हा चमत्कार झालाय. मीडिया रिपोर्ट्सनुसार, जुळ्या मुलांना जन्म देणाऱ्या महिलेचं नाव कैली आहे. कैलीने 31 डिसेंबर 2022 रोजी रात्री 11:55 वाजता आपल्या पहिल्या जुळ्या मुलीला जन्म दिला. त्याचबरोबर दुसऱ्या मुलाचा जन्म 1 जानेवारी रोजी दुपारी 12.01 वाजता झाला.
दोघांच्या जन्मात काही मिनिटांचा फरक आहे हे स्पष्ट आहे, पण वर्ष बदलले आणि एकाचा जन्म 2022 मध्ये झाला आणि दुसरा 2023 मध्ये जन्माला आला. ही जुळी मुले पूर्णपणे निरोगी आहेत, तसेच आई बनलेल्या स्त्रीचे आरोग्यही ठीक आहे, असेही अहवालात म्हटले आहे. या मुलांच्या जन्मानंतर त्यांचं संपूर्ण कुटुंब खूप आनंदी आणि उत्सवात मग्न आहे.
मुलांचा जन्म होताच या जोडप्याने दोन्ही मुलांचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आणि लोकांना त्यांच्यासाठी शुभेच्छाही मागितल्या. त्याने स्वत: आपल्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये दोन्ही मुलींचा जन्म कोणत्या वेळी झाला याबद्दल सांगितले आहे. लोकही त्यांना खूप शुभेच्छा देत आहेत आणि म्हणत आहेत की ते दोघेही खूप नशीबवान आहेत.