Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जणू सोनेरी रिबिनच.. ‘अटल सेतू’चं रात्रीचं विस्मयकारक दृश्य, पहा व्हिडीओ

आज (शुक्रवारी) देशातील सर्वांत मोठ्या सागरी सेतूचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. इंजीनिअरिंगचा आविष्कार मानल्या जाणाऱ्या या पुलाविषयी प्रचंड कुतूहल आहे. या पुलाचा एक व्हिडीओ आनंद महिंद्रा यांनी शेअर केला आहे. त्यात रात्रीच्या वेळी दिसणारं या पुलाचं दृश्य अत्यंत विस्मयकारक आहे.

जणू सोनेरी रिबिनच.. 'अटल सेतू'चं रात्रीचं विस्मयकारक दृश्य, पहा व्हिडीओ
Mumbai Trans Harbour LinkImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Jan 12, 2024 | 1:58 PM

मुंबई : 12 जानेवारी 2024 | अवघ्या पाच वर्षांत उभारण्यात आलेल्या देशातील सर्वांत लांब सागरी सेतूचं आज (शुक्रवारी) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात येणार आहे. या सेतूसाठी पाच बोईंग विमानं, 17 आयफेल टॉवर यांच्या वजनाइतका पोलाद वापरला गेला आहे. तर 84 हजार टन वजनाचे 70 स्टील डेक बसवण्यात आले आहेत. हा सेतू म्हणजे आधुनिक अभियांत्रिकी विश्वातील आविष्कार समजला जातोय. या सेतूमुळे मुंबई आणि नवी मुंबई या शहरांमधील प्रवासाचं अंतर कमी होणार आहे. मुंबईहून पुणे, कोकण तसंच पश्चिम महाराष्ट्राच्या दिशेने वाहनांसाठी हा सेतू वेगवान पर्याय ठरणार आहे. हा सागरी सेतू रात्रीच्या अंधारात आणखीनच आकर्षक दिसून येतो. त्याचा व्हिडीओ नुकताच सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ‘महिंद्रा अँड महिंद्रा’चे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनीच हा व्हिडीओ शेअर केला आहे.

आनंद महिंद्रा यांनी या सागरी सेतूला ‘गोल्डन रिबिन’ असं म्हटलंय. ‘मुंबई ट्रान्स हार्बर लिंकचा हा रात्रीचा व्हिडीओ. अत्यंत मेहनती आणि प्रतिभावान इंजीनिअर्सच्या अप्रतिम कामामुळे कनेक्टिव्हिटी आणि कॉमर्स या दोन्ही गोष्टी वाढतील. या गोल्डन रिबिनवर ड्राइव्ह करण्याची मी आणखी प्रतीक्षा करू शकत नाही’, असं त्यांनी लिहिलं आहे.

हे सुद्धा वाचा

या सागरी सेतूसाठी 2018 मध्ये कामाला सुरुवात करण्यात आली होती. त्यातही कोरोनाचं संकट असतानाही पाच वर्षांत हा सेतू उभारण्यात आला. या पुलाला ‘अटल सेतू’ असं नाव देण्यात आलं आहे. या अटल सेतुमुळे मुंबई ते नवी मुंबई अंतर हे 20 ते 22 मिनिटांत पार करता येणार आहे.

अटल सेतूची वैशिष्ट्ये-

  • या सेतुसाठी पृथ्वीच्या सात प्रदक्षिणा होतील इतक्या लांबीच्या केबलचा वापर करण्यात आला आहे.
  • अत्याधुनिक अशा ऑर्थोट्रॉपिक स्टील डेक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे.
  • 5 बोईंग विमानं, 17 आयफेल टॉवरच्या वजनाइतक्या लोखंडाचा वापर या सेतुसाठी करण्यात आला आहे.
  • हा सेतू 100 ते 150 वर्षे टिकणार असल्याचं म्हटलं जात आहे.
  • त्यात सात हजार मेट्रिक टन सळ्या वापरण्यात आल्या आहेत.
  • या पुलासाठी स्टॅच्यू ऑफ लिबर्टीपेक्षा सहा पट अधिक काँक्रीटचा वापर करण्यात आला आहे.
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.