बायका घाबरल्या, पळून गेल्या, लगेच बसायला जागा मिळाली, न भांडता…!
पण हल्ली सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतोय, ज्यात एका व्यक्तीने सीट मिळवण्याचं निन्जा टेक्निक शिकवलंय.
ट्रेन मध्ये जागा कशी मिळवायची बघायचं का? तेही न भांडता? हा व्हिडीओ बघा. तुम्हाला नक्कीच मदत मिळेल. एक काळ असा होता की लोक बस किंवा रिक्षा-टॅक्सीतून प्रवास करायचे, पण आजच्या काळात मेट्रो हा कुठेही प्रवास करण्यासाठी सर्वात सोयीचा मार्ग बनला आहे. विशेषत: ऑफिसमध्ये येणाऱ्यांसाठी मेट्रोपेक्षा चांगली साधनं दुसरी कोणतीच नाहीत. यामुळे अनेकदा मेट्रोमध्ये प्रचंड गर्दी होते हे तुम्ही पाहिलं असेलच. बसायला जागा मिळणं अशक्य आहे, पण हल्ली सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतोय, ज्यात एका व्यक्तीने सीट मिळवण्याचं निन्जा टेक्निक शिकवलंय.
व्हिडिओ
View this post on Instagram
बघताय ना…या निन्जा टेक्निकमुळे त्या व्यक्तीला मेट्रोमध्ये आरामदायी जागा मिळाली आणि एकाच वेळी एक जागाच नव्हे तर अनेक जागा रिकाम्या झाल्या.
महिला घाबरल्या आणि पटापट जागा रिकामी करून दिली. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, संपूर्ण सीट महिलांनी भरलेली आहे आणि समोर एक मुलगा तिथे उभा आहे.
त्याला बसायचं होतं, पण सीट रिकामी नव्हती, म्हणून त्याने एक युक्ती शोधून काढली. त्याने अचानक फिट आल्याचं नाटक केलं. मग काय, सीटवर बसलेल्या बायका लगेच तिथून उठून पळू लागल्या. अशा प्रकारे सीट रिकामी झाल्यावर आरामात जाऊन तो एका सीटवर बसला.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर raaj_official09 नावाच्या आयडीसह हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत 1.9 मिलियन वेळा पाहिला गेला आहे, तर 73 हजारहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ लाईकही केला आहे.