नर्सरीत शिक्षिकेच्या कामासाठी नीता अंबानी यांना मिळायचे फक्त इतके रुपये; पहा व्हिडीओ
अंबानी कुटुंबीय आता जरी अब्जाधीश असले तरी एकेकाळी नीता अंबानी यांना नर्सरीतील शिक्षिकेच्या नोकरीसाठी खूप कमी पगार मिळायचा. खुद्द नीता अंबानी एका चॅट शोमध्ये याबद्दलचा खुलासा केला होता. त्यांच्या मुलाखतीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मुंबई : 14 मार्च 2024 | डान्सर, सामाजिक कार्यकर्त्या, उद्योजिका, आयपीएल टीमच्या मालकीण.. अशी अनेक विशेषणं तुम्ही नीता अंबानी यांच्यासाठी वापरू शकता. मात्र फार क्वचित लोकांना माहीत असेल की नीता अंबानी यांनी शिक्षिका म्हणून त्यांच्या करिअरची सुरुवात केली होती. मुकेश अंबानी यांच्याशी लग्न केल्यानंतरही त्या शिक्षिका म्हणून काम करत होत्या. त्यावेळी मुकेश अंबानी हे रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख नव्हते. सोशल मीडियावर सध्या नीता आणि मुकेश अंबानी यांच्या मुलाखतीचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. सिमी गरेवाल यांना दोघांनी ही मुलाखत दिली होती. या मुलाखतीत नीता अंबानी यांनी खुलासा केला होता की लग्नाच्या वर्षभरातच त्यांनी सनफ्लॉवर नर्सरीसाठी शिक्षिका म्हणून काम करण्यास सुरुवात केली होती.
मुकेश आणि नीता अंबानी यांचं लग्न 1985 मध्ये झालं होतं. तीन आठवडे एकमेकांना भेटल्यानंतर, ओळखल्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. आकाश, इशा आणि अनंत या तीन मुलांच्या जन्मानंतर 2000 च्या सुरुवातीला दोघं सिमी गरेवाल यांच्या चॅट शोमध्ये एकत्र आले होते. या मुलाखतीत नीता अंबानी यांनी सांगितलं की त्यांना सनफ्लॉवर नर्सरीत शिक्षिका म्हणून काम केल्याबद्दल दर महिन्याला 800 रुपये मिळायचे. “काही लोक माझ्यावर हसायचे. पण त्या नोकरीने मला समाधान दिलं”, असं त्या म्हणाल्या होत्या.
पहा व्हिडीओ-
View this post on Instagram
जेव्हा नीता यांनी सांगितलं की त्यांना शिक्षिकेच्या नोकरीसाठी दर महिन्याला 800 रुपये मिळायचे, ते ऐकून मुकेश अंबानी मस्करीत म्हणाले, “आमच्या सर्व डिनरसाठी ते पैसे कामी आले.” यावर नीता पुढे म्हणाल्या, “त्यावेळी लोक माझ्यावर हसायचे. पण मला त्या कामामुळे खूप समाधान मिळायचं.” सोशल मीडियावर नीता आणि मुकेश अंबानी यांच्या मुलाखतीचा हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओला आतापर्यंत इन्स्टाग्रामवर 3.3 दशलक्ष व्ह्यूज मिळाले आहेत.
नीता अंबानी या आता जरी फुल-टाइम शिक्षिका नसल्या तरी शिक्षणासाठी त्या अद्याप काम करत आहेत. आज त्या देशातील नामांकित धीरुभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूल चालवतात. या शाळेत बऱ्याच सेलिब्रिटींची मुलं शिकतात.