Handkerchiefs Seller : झटक्यात पळून जाईल तुझी निराशा भाऊ, एकदा वाच या 74 वर्षीय ‘चाचा’ची कर्मकहाणी!

Handkerchiefs Seller : जीवनात काहीच राम उरला नाही असे वाटत असेल तर तुमच्यासाठीच ही प्रेरणादायी कहाणी, घरी बसण्यापेक्षा आयुष्यात काही तरी चांगलं करण्याचा, कार्यरत राहण्याचा काही जण प्रयत्न करतात. मुंबईतील या आजोबांची कहाणी सध्या सोशल माध्यमांवर यामुळेच व्हायरल होत आहे.

Handkerchiefs Seller : झटक्यात पळून जाईल तुझी निराशा भाऊ, एकदा वाच या 74 वर्षीय 'चाचा'ची कर्मकहाणी!
Follow us
| Updated on: Apr 29, 2023 | 11:19 AM

मुंबई : जर तुम्हाला पण निराश वाटत असेल. जीवनात काहीच राम उरला नाही असे वाटत असेल तर मुंबईतील या चाचांची ही कहाणी खास तुमच्यासाठीच. काहीच न करता, तुमच्या अपयशासाठी जर तुम्ही इतरांना दोषी ठरवत असाल तर ही प्रेरणादायी कहाणी जरुर वाचा. तुमची निराशा झटक्यात पळून जाईल. 74 वर्षांच्या या आजोबांनी सर्व तरुणांसमोर मोठा आदर्श निर्माण केला आहे. हे आजोबा एक दशकापूर्वीच निवृत्त झाले आहेत. पण काम करण्याची त्यांच्यात कोण उर्मी आहे. मुंबईतील बोरीवली स्टेशनवर (Borivali Station) ते रुमाल विक्री (Handkerchiefs Seller ) करतात. या वयात खरं तर अनेक जण खूर्ची, बाज, कॉट, पलंग सोडत नाहीत. पण हे काका त्याला अपवाद आहेत. त्यांना तसं तर कमाई करण्याची गरज नाही. पण त्यांचे एक उत्तर तुमचे जीवन बदलविल्याशिवाय राहणार नाही.

लाडके काका हसन अली असे या 74 वर्षींय तरुणाचे नाव आहे. परिसरातील लोक त्यांना काका म्हणून ओळखतात. मुंबईतील बोरीवली स्टेशनवर ते हात रुमाल विक्रीचे काम करतात. ह्युमन्स ऑफ बॉम्बेने (Humans of Bombay) इन्टाग्रामवर त्यांची कहाणी शेअर केली आहे. यापूर्वी ते एका शू-मार्टमध्ये कामाला होते. त्यामुळे त्यांच्याकडे विक्रीचे कौशल्य आहे. त्यांना विक्रीचे तंत्रज्ञान तोंडपाठ आहे. हे कसब त्यांच्या रक्तातच आहे. त्याच जोरावर ते रुमालांची विक्री करतात.

हे सुद्धा वाचा

पैशांची नाही गरज गेल्या 17 वर्षांपासून हसन चाचा या परिसरात रुमालाची विक्री करतात. ग्राहकाची नजर, त्याचा स्वभाव याआधारे ग्राहकाला कोणता रुमाल आवडला हे ते अचूक ओळखतात. गेल्या कित्येक वर्षांपासून हे कसब त्यांना उपयोगी पडते. त्यांचे छोटेखानी कुटुंब आहे. त्यांची पत्नी, एक मुलगा, सून आणि नात असा छोटेखानी संसार आहे. घर सर्व व्यवस्थित आहे. पण तरीही ते आराम करत नाहीत. त्यांचा मुलगा, सारखा त्यांना हे काम बंद करण्याचा तगादा लावतो. पण त्यावर चाचाचे उत्तर खासमखास आहे.

ग्राहकांचा विश्वास ग्राहक त्यांना प्रेमाने काका म्हणतात. जवळच असलेल्या परिसरातून बस पकडून ते बोरवली स्टेशन गाठतात. याठिकाणी इतक्या वर्षांपासून इमानदारीने व्यवसाय करत असल्याने अनेक ग्राहक त्यांचे परिचयाचे झाले आहे. ते त्यांच्याकडूनच रुमालाची खरेदी करतात. ग्राहकांकडून मिळणाऱ्या प्रेमातच खरी जादू असल्याचे चाचा सांगतात.

काकाच्या उत्तराने मनं जिंकलं आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, या काकाच्या घरी सर्व व्यवस्थित असताना, त्यांना काम करण्याची गरज काय? तर चाचांनीच त्याचं खास उत्तर दिलं आहे. त्यांचा मुलगा, घरातील सदस्य त्यांना आता आरामाचा सल्ला देतात. ‘जोपर्यंत जीवंत आहे, तोपर्यंत मला सक्रीय रहायचे आहे, मला आथंरुणावर खिळून रहायचं नाही.’ असं पण या काकाचं त्यावर उत्तर खूपच मनाला भिडणारं आहे. प्रेरणादायी आहे.

Non Stop LIVE Update
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.