भारतातल्या ‘या’ कालीमातेच्या प्रसिद्ध मंदिरात नूडल्स, चाऊमिनचा प्रसाद, चिनी लोकांच्या रांगा

आम्ही तुम्हाला एका खास मंदिराबाबत माहिती देणार आहोत. या मंदिरात मोदक, लाडू, फळं, शिरा किंवा कोणतेही गोड पदार्थ प्रसाद म्हणून दिले जात नाहीत, तर या मंदिरात चक्क नूडल्स, चाऊमिन सारखे पदार्थ प्रसाद म्हणून दिले जातात.

भारतातल्या 'या' कालीमातेच्या प्रसिद्ध मंदिरात नूडल्स, चाऊमिनचा प्रसाद, चिनी लोकांच्या रांगा
Follow us
| Updated on: Aug 23, 2021 | 3:52 PM

मुंबई : प्राचीन काळापासून आपल्या देशात धर्माला खूप महत्त्व दिलं जात आहे. प्रत्येक धर्माची धार्मिक स्थळं असतात किंवा प्रार्थना स्थळं असतात. हिंदू धर्मात मंदिरांना विशेष महत्त्व आहे. मंदिर हे धर्माचं, संस्कृतीचं प्रतीक मानलं जातं, आणि मंदिर म्हटलं की, एक गोष्ट डोळ्यासमोर येते ती म्हणजे मंदिरात दिला जाणारा प्रसाद. आजपर्यंत तुम्ही वेगवेगळ्या मंदिरांमध्ये वेगवगळे पदार्थ प्रसाद म्हणून खाल्ले असतील. प्रामुख्याने ज्या देवाचं मंदिर आहे, त्या देवाला आवडणारा पदार्थ मंदिरांमध्ये प्रसाद म्हणून दिला जातो, उदा. गणपतीला मोदक, लाडू आवडतात त्यामुळे गणपतीच्या मंदिरांमध्ये प्रसाद म्हणून मोदक किंवा लाडू मिळतात. काही ठिकाणी प्रसाद म्हणून फळं दिली जातात. बहुतेक मंदिरांमध्ये प्रसाद म्हणून गोड पदार्थच वाटले जातात. काही मंदिरं त्याला अपवादही असतात. आज आम्ही तुम्हाला अशाच एका वेगळ्या मंदिराबाबत माहिती देणार आहोत. या मंदिरात मोदक, लाडू, फळं, शिरा किंवा कोणतेही गोड पदार्थ दिले जात नाहीत, तर या मंदिरात चक्क नूडल्स, चाऊमिन, Chop Suey आणि Sticky Rice सारखे पदार्थ प्रसाद म्हणून दिले जातात. (Noodles, Chow mein And Sticky Rice Served as Prasad in This Chinese Kali Temple in Kolkata India)

आम्ही कोलकाताच्या टांगरा (चायनाटाउन) परिसरात असलेल्या चिनी काली मंदिराबद्दल बोलत आहोत, येथील पूजेची परंपरा आणि प्रसाद हे या मंदिराला देशभरातील कालीमातेच्या इतर मंदिरांपेक्षा किंवा इतर कोणत्याही मंदिरांपेक्षा वेगळे आणि खास बनवते. या मंदिराचे नाव आहे चीनी काली मंदिर (Chinese Kali Temple). केवळ मंदिराचे नावच वेगळे नाही, तर येथे दिसणारे भक्तही विशेष आहेत. येथे तुम्हाला असे अनेक भक्त पाहायला मिळतील जे चिनी आहेत. भारतीय किंवा बंगाली भाविकांसोबतच येथे मोठ्या प्रमाणात चिनी लोकही कालीमातेच्या दर्शनासाठी रांगा लावतात.

चायनीज काली मंदिरात चाऊमीन आणि नूडल्सचा प्रसाद!

या मंदिरात काली मातेच्या दर्शनासाठी लोक दूरदूरवरून येतात, पण येथील सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे येथे मिळणारा प्रसाद. येथे भक्तांना अनेकदा प्रसाद म्हणून चायनीज नूडल्स, चॉपस्टिक, भात (स्टिकी राईस) किंवा वेगवेगळ्या भाज्या प्रसाद म्हणून दिल्या जातात. गंमत म्हणजे देवीच्या चरणी नैवेद्य म्हणून तेच पदार्थ अर्पण केले जातात. नैवेद्याव्यतिरिक्त येथे मेणबत्त्या आणि चायनीज अगरबत्ती पेटवण्याची परंपरा आहे. तुम्हाला विशेषतः मंदिरात लाल रंगाचा वापर दिसेल. येथे येणारे चिनी लोक चिनी पद्धतीने देवीची पूजा करतात.

View this post on Instagram

A post shared by Riya Welingkar (@_riwel_)

इतर बातम्या

जंगलाच्या राजाकडून गिधाडाची शिकार, Video पाहून तुम्हीही म्हणाल, ‘काय चपळाई आहे!’

Video | पाणीपुरीवाल्याचा प्रताप, लघवी करुन पाण्यात मिसळली, व्हिडीओ पाहून देशभरात संताप

Video | डोसा खाण्यासाठी लोकांची झुुंबड, तयार होण्याआधीच तुटून पडले, नेटकरी अवाक्

(Noodles, Chow mein And Sticky Rice Served as Prasad in This Chinese Kali Temple in Kolkata India)

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.