Nostradamus Predications : भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाचे ढग, तिसर्या महायुद्धाचे काय कनेक्शन, पहेलगाम हल्ल्यानंतर नास्त्रेदमसची भविष्यवाणीने एकच गोंधळ
Pahalgam Terror Attack Nostradamus Predictions : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंत नास्त्रेदमसची ती भविष्यवाणी चर्चेत आली आहे. भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचे ढग आहे. दोन्ही देशात भीषण संघर्ष होण्याची शक्यता आहे. त्यातच नास्त्रेदमसने तिसर्या विश्वयुद्धाचे भाकीत केले आहे.

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर फ्रान्सचा भविष्यवत्ता नास्त्रेदमसची भविष्यवाणी र्चेत आली आहे. नास्त्रेदमसच्या भाकिताकडे जग गांभीर्याने बघते. नास्त्रेदमस यांच्या लेस प्रोफेटीज या पुस्तकात त्याने ज्या घटनांची नोंद केली आहे. त्याचा जागतिक घटनांशी संबंध असल्याचा दावा करण्यात येतो. त्यातील भाकीतं ही गूढ आहे. लोक त्यांच्या पद्धतीने त्याचा अर्थ काढतात. पण त्यातील अनेक घटना घडल्यानंतर जगाने नास्त्रेदमसच्या पुस्तकावर संशोधन सुरु केले. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर नास्त्रेदमसची ती भविष्यवाणी पुन्हा चर्चेत आली आहे. त्यात त्यांनी तिसऱ्या महायुद्धाची नांदी लवकरच येणार असल्याचा दावा केला आहे. सध्या जगातील काही खंडात ताण तणाव सुरू असतानाच भारत-पाकमधील ताणलेल्या संबंधाशी लोक हे भाकीत जोडून पाहत आहेत.
हल्ल्यानंतर एकच असंतोष
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये सध्या तणाव वाढला आहे. भारताने ताबडतोब सिंधु पाणी करार रद्द केला आहे. तर पाकिस्तानकडून सातत्याने पोकळ धमक्या देण्यात येत आहे. संयुक्त राष्ट्राने दोन्ही देशांना शांतता आणि संयम ठेवण्याचे आवाहन केले आहे. पण भारताने 26 निरपराध पर्यटकांचा जीव गेल्याने दहशतवाद्यांना धडा शिकवण्याचा मानस केला आहे. त्यामुळे पाकिस्तानचा तिळपापड होत आहे. भारत केव्हा ही पाकव्याप्त काश्मीरवर हल्ला करण्याची भीती पाकिस्तानला सतावत आहे.




तिसर्या महायुद्धाविषय़ी ती भविष्यवाणी काय?
जगात रशिया-युक्रेन युद्ध, हमास-इस्त्रायल युद्ध, पश्चिम आशियातील तणावाची स्थिती यामुळे अनेक देशांचे हितसंबंध बाधित झाले आहे. त्यातच अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या व्यापार धोरणाचा मोठा फटका जगाला बसत आहे. द्वितीय महायुद्धात जग दोन खेम्यात वाटल्या गेले होते. तिसर्या महायु्द्धाच्यावेळी सुद्धा असेच काही घडण्याची स्थिती आहे. नास्त्रेदमसच्या भविष्यवाणीनुसार, वर्ष 2012 ते 2025 या दरम्यान तिसऱ्या महायुद्धाची नांदी येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
त्यात अजून आस्तिक आणि नास्तिक असा एक वाद उभा ठाकला आहे. काही धार्मिक कट्टरतावादी या लढाईला तोंड फोडतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्याचवेळी एक जागतिक प्रभावी नेता सर्व लढ्याचे नेतृत्व करुन शांतता प्रस्तापित करेल आणि तो नेता आशियातील असेल अशी भविष्यवाणी नास्त्रेदमस यांनी केली आहे.
डिस्क्लेमर : हा लेख केवळ माहितीपर आणि चर्चेच्या हेतूने देण्यात आला आहे. या दाव्याची टीव्ही ९ मराठी पुष्टी करत नाही.