कोण म्हणतं मुंबईच्या लोकलमध्ये फक्त बसण्यासाठी भांडणं होतात? हा व्हिडीओ तर बघा
अनेकदा आपण ती इंग्लिश म्हण विसरतो की Age Is Just A Number! वय फक्त आकडा आहे. या आकड्यावर निर्भर असं काहीच नसतं. ना तुमची एनर्जी, ना तुमची स्वप्न आणि ना प्रेम! डान्स करायला एनर्जी लागते आणि ही एनर्जी वयावर थोडीच असते? हा व्हिडीओ बघून तुम्हाला आम्ही काय बोलतोय ते समजेल आणि पटेल सुद्धा.
मुंबई: आपण म्हणतो, “वय झालं आता काय शक्य नाही”. अनेकदा आपण ती इंग्लिश म्हण विसरतो की Age Is Just A Number! वय फक्त आकडा आहे. या आकड्यावर निर्भर असं काहीच नसतं. ना तुमची एनर्जी, ना तुमची स्वप्न आणि ना प्रेम! डान्स करायला एनर्जी लागते आणि ही एनर्जी वयावर थोडीच असते? हा व्हिडीओ बघून तुम्हाला आम्ही काय बोलतोय ते समजेल आणि पटेल सुद्धा. हा क्यूट व्हायरल व्हिडिओ आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आहे. ‘ओ मेरे दिल के चैन’ या गाण्यावर आजोबा मनसोक्त नाचताना दिसत आहेत. काही सेकंदाची ही क्लिप लोकांना खूप आवडत आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक म्हणत आहेत- कोण म्हणाले की लोकल ट्रेनमध्ये आम्ही फक्त सीटसाठी लढतो.
एका वृद्ध व्यक्तीने मुंबई लोकल ट्रेनमध्ये इतका मस्त डान्स केला की सर्वजण बघत होते. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, मुंबई लोकल खचाखच भरलेली आहे. अनेक वृद्ध व्यक्ती आपल्या जागेवर बसून आहेत. बसल्या आहेत, तर अनेक जण त्यांच्या भोवती उभे राहून प्रवास करत आहेत. तेवढ्यात गर्दीतील एक तरुण ‘ओ मेरे दिल के चेन’ हे गाणं गायला सुरु करतो. हे गाणं ऐकताच तिथे बसलेले आजोबा यावर नाचू लागतात. हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झालाय.
View this post on Instagram
व्हिडिओमध्ये तुम्ही ज्या व्यक्तीचं गाणं ऐकत आहात त्याचं नाव शशांक पांडे आहे. त्याने स्वत: आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडिओ @sashankpandeyy याने शेअर केला आहे. शशांकच्या इन्स्टा प्रोफाईलवरून तो गायक, गीतकार, लाइव्ह परफॉर्मर आणि अभिनेता असल्याचे दिसून येतंय. याशिवाय त्याने स्वत:ला गिनीज रेकॉर्डहोल्डर देखील म्हटले आहे.