‘ओsss शेठ’ नादच केलाय थेट, महाराष्ट्राचं नवं सुपरहिट गाणं ऐकलंत का? राज ठाकरेंच्या हस्तेही सत्कार

सध्या 'ओsss शेठ तुम्ही नादच केलाय थेट' या गाण्याने समस्त महाराष्ट्राला वेड लावले आहे. या गाण्याला ऐकताच तरुणांपासून ते वृद्धांपर्यंत लोक ठेका धरत आहेत.

'ओsss शेठ' नादच केलाय थेट, महाराष्ट्राचं नवं सुपरहिट गाणं ऐकलंत का? राज ठाकरेंच्या हस्तेही सत्कार
O SHETH VIRAL SONG
Follow us
| Updated on: Jul 28, 2021 | 8:09 PM

मुंबई : मराठीतील अभिनय, चित्रपट तसेच गीत, संगीत क्षेत्र हे चांगलेच व्यापक आहे. येथे कधी कोण कशाची निर्मिती करेल हे सांगता येत नाही. सध्या ‘ओsss शेठ तुम्ही नादच केलाय थेट’ या गाण्याने समस्त महाराष्ट्राला वेड लावले आहे. या गाण्याला ऐकताच तरुणांपासून ते वृद्धांपर्यंत लोक ठेका धरत आहेत. विशेष म्हणजे या गाण्याची दखल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीसुद्धा घेतली असून त्यांनी या गीताचे गायक उमेश गवळी यांचा सत्कार केला आहे. (o shet tumhi nadach kelay thet marathi song went viral raj thackeray appreciated singar)

इन्स्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सअ‌ॅपवर ओ शेठची चर्चा 

सध्या इन्स्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सअ‌ॅप स्टेटस अशा सर्वच ठिकाणी एकाच गाण्याची चर्चा आहे. ओ शेठ म्हटलं की प्रत्येकजण तुम्ही नादच केलाय थेट असे आपसुकच म्हणतोय. या गाण्याचा बोलबाला समस्त महाराष्ट्रात सुरु आहे. मिळालेल्या माहितीनुसार या गाण्याला फक्त रेकॉर्ड करण्यात आले आहे. हे गाणे व्हिडीओ स्वरुपात अद्याप तयार करण्यात आलेले नाही. मात्र, फक्त ऑडिओ स्वरुपातील या गाण्याला लोकांनी अक्षरश: डोक्यावर घेतलेय.

गाण्याला एवढी प्रसिद्धी मिळेल याची कल्पनादेखील नव्हती

गायक उमेश गवळी यांनी हे गाणं गायलं असून संध्या आणि प्रणिकेत यांनी या गाण्याला लिहलंय. तसेच त्यांनीच या गाण्याला संगीतसुद्धा दिलंय. या गाण्याची रेकॉर्डिंग केल्यानंतर गाण्याला एवढी प्रसिद्धी मिळेल याची कल्पनादेखील त्यांना नव्हती. मात्र, या गाण्याला युट्यूब तसेच इतर माध्यमांवर कोटीच्या संख्येने पाहिले गेले आहे. या अनोख्या यशामुळे गायक उमेश गवळी तसेच संगीतकार संध्या आणि प्रणिकेत यांना अतिशय आनंद झालाय.

गाण्याच्या माध्यमातून मोदींना ट्रोल

या गाण्याला प्रसिद्धी मिळण्यामागची कहानी फारच वेगळी आहे. सध्या देशभरात इंधनाचा भडका उडाल्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष आहे. याच कारणामुळे या गाण्याची मदत घेऊन काही लोकांनी मजेदार मिम्स केले आहेत. या मिम्समध्ये एका बाजूला इंधनाचे गगनाला भिडलेले भाव तर दुसऱ्या बाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो लावण्यात आलाय. या मिमसोबत लोकांनी ओ शेठ या गाण्याला जोडले आहे. इंधनाचे वाढलेले दर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर उपहासात्मक टीका करण्यासाठी या गाण्याचा पुरेपूर उपयोग झाला. ओ शेठ हे गाणे चर्चेत येण्यास हे एक महत्त्वाचे कारण ठरले.

गाण्याचा चमू समाधानी

दरम्यान, या गाण्याला इन्स्टाग्रामवरुद्धा रिल्स तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात वापरण्यात आले. इन्स्टाग्राम रिल्स, व्हॉट्सअ‌ॅप स्टेटस, तसेच एखाद्या व्यक्तीचे गोडवे गाण्यासाठी या गाण्याचे बोल चपखल असल्यामुळे लोकांनी त्याला डोक्यावर घेतले आहे. राज ठाकरे यांनीदेखील गायक उमेश गवळी यांचा सत्कार केल्यामुळे ‘ओ sss शेठ’ या गाण्याचा चमू समाधान व्यक्त करत आहे.

पाहा व्हिडीओ :

इतर बातम्या :

VIDEO : धीर तरी कसा देऊ, हातावर नोटा ठेवून उर्मिला मातोंडकर ढसाढसा रडल्या

Bhetli Ti Punha 2 : वैभव तत्ववादी आणि पूजा सावंत ही सुंदर जोडी पुन्हा येणार भेटीला, ‘भेटली ती पुन्हा 2’ ची घोषणा

Net Worth : ‘गँग्स ऑफ वासेपुर’मधून हुमा कुरेशीची बॉलिवूडमध्ये एण्ट्री, एका चित्रपटासाठी घेते एवढी रक्कम

(o shet tumhi nadach kelay thet marathi song went viral raj thackeray appreciated singar)

हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.