ही नाणी तुम्ही कधी वापरली आहेत का? IAS अधिकाऱ्याने विचारल्यावर कमेंट्सचा पाऊस
नुकताच IAS अधिकारी अवनीश शरण यांनी ट्विटरवर एक फोटो शेअर करत लोकांना विचारले की हे जुने नाणे किती लोकांनी पाहिले आहे आणि त्यात तुमची कोणती आठवण जोडली गेलीये?
जुनी नाणी पाहून तुम्हाला अजूनही आश्चर्य वाटते का, जुन्या काळातील लोक ते कसे वापरत असत? आजी आणि आजोबांच्या काळात जपून ठेवलेली नाणी पाहून लोक हैराण होतात. सध्या अशी जुनी नाणी अत्यंत मौल्यवान झाली आहेत. नुकताच IAS अधिकारी अवनीश शरण यांनी ट्विटरवर एक फोटो शेअर करत लोकांना विचारले की हे जुने नाणे किती लोकांनी पाहिले आहे आणि त्यात तुमची कोणती आठवण जोडली गेलीये? IAS अधिकाऱ्याने ट्विटरवर 1968 नंतर च्या सहा वेगवेगळ्या भारतीय पैशांचा फोटो शेअर केला, ज्यानंतर ट्विटर युजर्स खूप आश्चर्यचकित झाले.
ही नाणी तुम्ही कधी वापरली आहेत का?
आयएएस अधिकारी अवनीश शरण यांनी शेअर केलेला हा फोटो पाहून लोकांनी कमेंट्स मध्ये आपली कहाणी सांगितली. लोकांना आपले जुने दिवस आठवले. फोटो शेअर करण्यासोबतच त्यांनी एक प्रश्नही विचारला आहे. हा प्रश्न वाचल्यानंतर अनेकांनी आपापल्या कहाण्या शेअर केल्या. फोटोत तुम्ही पाहू शकता की दोन पैसे, तीन पैसे, पाच पैसे, दहा पैसे, पंचवीस पैसे आणि पन्नास पैसे अशी सहा नाणी तुम्हाला दिसतील. काहींनी सर्व नाण्यांशी संबंधित त्यांच्या कथा सांगितल्या, तर अनेकांनी यातील मोजकीच नाणी पाहिलेली आहेत.
इनमें से किस सिक्के से आपने कुछ ख़रीदा है ? pic.twitter.com/bCLkOCo0D3
— Awanish Sharan (@AwanishSharan) February 25, 2023
ही पोस्ट पाहिल्यानंतर एका युजरने लिहिलं, ‘या नाण्यात काहीतरी वेगळं होतं.’ आणखी एका युजरने लिहिले की, माझे वय 51 वर्षे आहे आणि मी ही सर्व नाणी वापरली आहेत. दुसऱ्याने लिहिले की, “आजच्या मुलांसाठी हे नाणे केवळ एक खेळणे आहे, परंतु कधीकधी या नाण्यांच्या मदतीने लग्नाची तयारी देखील केली जायची.”