VIDEO | सोचेंगे तुम्हे प्यार करे के नहीं… डोक्यावर पदर सावरत गाणाऱ्या आजींचा गोड व्हिडीओ पाहिलात?

"सोचेंगे तुम्हे प्यार करे के नहीं... ये दिल बेक़रार करें के नहीं" हे 'दिवाना' चित्रपटातील गाणं 1992 मध्ये तुफान लोकप्रिय झालं होतं (Old Lady Singing Sochenge Tumhe Pyar)

VIDEO | सोचेंगे तुम्हे प्यार करे के नहीं... डोक्यावर पदर सावरत गाणाऱ्या आजींचा गोड व्हिडीओ पाहिलात?
आजींच्या आवाजातील सुमधुर गाणं व्हायरल
Follow us
| Updated on: May 05, 2021 | 2:49 PM

मुंबई : लॉकडाऊनच्या काळात अनेक जणांनी आपले छंद पुन्हा जोपासायला सुरुवात केली आहे. जी पावलं केवळ बॉसच्या तालावर नाचत होती, त्यांना घरच्या व्यासपीठावर पुन्हा आपलं पदलालित्य दाखवण्याची संधी मिळाली. ज्या गात्या गळ्यांना केवळ ऑफिसच्या मीटिंगमध्ये कंठ फुटायचे, त्यांनी पुन्हा षड्ज लावायला घेतले. असाच एक सुरेल आवाज सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. छंद जोपासायला वयाचं बंधन नसतं, हे सांगणाऱ्या एका आजीबाईंचा व्हिडीओ सध्या लक्ष वेधून घेत आहे. (Old Lady Singing Sochenge Tumhe Pyar Kare Ke Nahi Deewana Movie Song Social Media Viral Video)

पिवळी साडी, डोक्यावर पदर सावरत “सोचेंगे तुम्हे प्यार करे के नहीं… ये दिल बेक़रार करें के नहीं, ख़्वाबों में छुपाया तुमको, यादों में बसाया तुमको, मिलोगे हमें तुम, जानम कहीं न कहीं” असं पोटतिडकीने गाणाऱ्या आजीबाई तितक्याच गोड वाटतात. हा व्हिडीओ नेमका कुठला आहे, त्या आजी कोण आहेत, हे मात्र अद्याप समजलेलं नाही.

कुमार सानूचा दर्दभरा आवाज

“सोचेंगे तुम्हे प्यार करे के नहीं… ये दिल बेक़रार करें के नहीं” हे ‘दिवाना’ चित्रपटातील गाणं 1992 मध्ये तुफान लोकप्रिय झालं होतं. जवळपास तीस वर्ष उलटून गेल्यानंतरही या गाण्याची जादू ओसरलेली नाही. कुमार सानूच्या दर्दभऱ्या आवाजातील हे गाणं नव्वदच्या दशकात प्रत्येकाच्या ओठी होतं. प्रेमभंग झालेल्या तरुणाईसाठी तर ते अँथम साँगच झालं होतं.

तीन दशकांनंतरही हे गाणं तितकंच ताजं टवटवीत वाटतं. कुमार सानू यांना या गाण्यासाठी मानाच्या फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट पार्श्वगायकाचा पुरस्कारही मिळाला होता. प्रसिद्ध गीतकार समीर यांच्या लेखणीतून या गाण्याचे शब्द उतरले होते. या गाण्यात ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर आणि अभिनेत्री दिव्या भारती यांची जोडी होती. दुर्दैवाने हे दोन्ही कलाकार आज आपल्यात नाहीत. ऋषी कपूर यांचे गेल्याच वर्षी निधन झाले. या गाण्यात नसला, तरी अभिनेता शाहरुख खानची सिनेमातील व्यक्तिरेखाही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती.

नदीम श्रवण यांचं संगीत

“सोचेंगे तुम्हे प्यार करे के नहीं… ” या गाण्याला संगीत लाभलं ते त्या काळातील प्रसिद्ध जोडी नदीम श्रवण यांचं. या जोडीतील श्रवण राठोड यांचं नुकतंच कोरोना संसर्गाने निधन झालं. त्यामुळे आजीबाईंनी हे गाणं गात त्यांना एकप्रकारे आगळी वेगळी आदरांजलीच दिली आहे. (Old Lady Singing Sochenge Tumhe Pyar)

दिवाना सिनेमातील गाणी लोकप्रिय

‘दिवाना’ चित्रपटातील “सोचेंगे तुम्हे प्यार करे के नहीं… ” सोबतच “ऐसी दिवानगी… देखीं नहीं कभी”, “तेरी उमीद तेरी इंतजार”, “पायलिया” अशी रोमँटिक गाणीही गाजली होती. कुमार सानू यांच्यासोबतच अल्का याज्ञिक, साधना सरगम, विनोद राठोड यांच्या सुमधुर आवाजात ही गाणी लोकप्रिय झाली होती. या सिनेमातील गीतांसाठी नदीम श्रवण यांना फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट संगीतकाराचा पुरस्कारही मिळाला होता.

पाहा व्हिडीओ :

संबंधित बातम्या :

Video | इंजेक्शनची सुई पाहून तरुणीला फुटला घाम, नंतर जे घडलं ते एकदा पाहाच !

VIDEO : लग्नात कोरोनाची भीती, नवरदेव-नवरीने थेट काठीने वरमाला घातल्या

(Old Lady Singing Sochenge Tumhe Pyar Kare Ke Nahi Deewana Movie Song Social Media Viral Video)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.