बघता बघता आपल्यालाही वाटतं आयुष्य असं जगता यावं! Viral Video
मस्त मगन असणारा माणूस मनाला भावतो. आपल्याला वाटतं आयुष्य असं जगता यावं!
सोशल मीडियावर सायकल स्टंट्स खूप दिसतात, पण हा स्टंट खास आहे कारण यात एक वयस्कर काका आपल्या सायकलचं हँडल सोडून सायकल चालवताना दिसत आहेत. सायकल चालवताना ते इतके छान एन्जॉय करतायत की व्हिडीओ एकदम बघण्यासारखा आहे. आजोबांचा व्हिडीओ मागून कुणीतरी कैद केलाय. मस्त मगन असणारा माणूस मनाला भावतो. आपल्याला वाटतं आयुष्य असं जगता यावं!
खरंतर हा व्हिडिओ एका युझरने ट्विटरवर शेअर केला आहे. प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या, असे कॅप्शन लिहिले आहे. या व्हिडीओमध्ये एक काका सायकल चालवताना दिसत आहेत.
हा व्हिडिओ पाहून असं वाटतं की हा पावसाळ्यातला आहे कारण रस्ता ओला वाटतो आणि आजूबाजूचं हवामान खूप आल्हाददायक आहे.
वयस्कर काका सायकलवर स्टंट करताना दिसतात. ते सायकल चालवताना कधी हवेत हात हलवताना तर कधी टायटॅनिक पोज देताना दिसतात.
Enjoy every moment ❤️ pic.twitter.com/sOujOxmEfD
— ज़िन्दगी गुलज़ार है ! (@Gulzar_sahab) November 29, 2022
त्यानंतर काही वेळाने हा वयस्कर माणूस चक्क आपले दोन्ही पाय सायकल चालवताना वर करतात. हात सोडून, पाय सोडून सायकल चालवतात. त्यांच्याकडे पाहून असं वाटतं, की एखादा छोटासा मुलगा रस्त्यावर मजा करतोय.
हा व्हिडिओ पोस्ट होताच प्रचंड व्हायरल झाला असला तरी त्यावर मात्र सर्वच जण संमिश्र प्रतिक्रिया देत आहेत. एका युझरने लिहिले की, हे चांगले आहे की काका खूप आनंदी दिसतात पण जर थोडी चूक झाली तर त्यांना दुखापत होऊ शकते.