Video | …जेव्हा हत्ती सोंडेनं त्याला म्हणाला, ‘Thanks यार! तुझ्यामुळे रस्ता क्रॉस करु शकलो’
दररोज प्राण्यांचे अनेक व्हिडीओ समोर येत असतात. नवनव्या या व्हिडीओतून प्राण्यांच्या एकापेक्षा एक सरस गोष्टी कॅमेऱ्यात कैद झाल्याचं आपण पाहत आलोय. असाच एक व्हिडीओ आहे हत्तींच्या कळपाचा. या व्हिडीओत एक हत्ती चक्क माणसाला थॅक्यू म्हणतोय.
कुणी तुम्हाला मदत केली तर तुम्ही त्याला थॅक्यू म्हणत असाल किंवा थम्प्सअप करत असालच की! अनेकदा अनोळखी लोकं आपली मदत करुन जातात. त्याचं नाव, गाव, ओळख आपल्याला काहीही नसते. रस्त्यावर, ट्रेनमध्ये, बसमध्ये, दुकानात कधीही कोणत्याही क्षणी कोण कशी मदत करेल, हे आपल्याला माहीत थोडीच असतं? पण अशा मदत केलेल्यांचे आभार मानायला आपण कधीच विसरत नाहीत. एक थॅक्यू आपण पटकन त्यांना लगेच बोलून त्यांच्याप्रती आपले आभार व्यक्त करतोच. मदत केलेल्याला थॅक्स म्हणण्याची सवय जशी लहानपणापासूनच लावली जाते, तशी ती मोठेपणी सुद्धा आपल्या श्वासांसारखीच आपल्या जगण्याचा भाग बनून जाते. आता माणूस आपल्या स्टाईलने वेगवेगळ्या प्रकारे थॅक्स म्हणतो. कधी थम्पअप करतो. कधी भेटवस्तू देतो. कधी प्रेमपूर्वक सत्कार करतो!
थॅक्स म्हणण्याची हीच गोष्ट फक्त माणसांमध्येच आहे, असा जर तुमचा समज असेल, तर तुम्ही चुकताय. प्राणीही थॅक्स म्हणातात. त्यांनाही आभार व्यक्त करता येतात. आपल्याला मदत करणाऱ्यांना धन्यवाद देण्याची प्राण्यांची स्टाईल माणसासारखी नसेलही. पण त्यातली भावना मात्र मनापासून आलेली आहे, हे लक्षात घेण्यासाठी आपल्याला हत्तींचा एक व्हिडीओ पाहावा लागेल!
नेमकं काय झालं?
दररोज प्राण्यांचे अनेक व्हिडीओ समोर येत असतात. नवनव्या या व्हिडीओतून प्राण्यांच्या एकापेक्षा एक सरस गोष्टी कॅमेऱ्यात कैद झाल्याचं आपण पाहत आलोय. असाच एक व्हिडीओ आहे हत्तींच्या कळपाचा. या व्हिडीओत एक हत्ती चक्क माणसाला थॅक्यू म्हणतोय. अर्थात तोंडानं नाही, तर आपल्या सोंडेनं!
कसं काय?
त्याचं झालं असं की हत्तींचा एक कळप रस्ता क्रॉस करत होता. पण रस्त्यावर वाहनांची वर्दळ काही थांबेना. त्यात पावसामुळे डांबरी रस्ता पूर्ण निसरडा झालेला. अशात आता रस्ता क्रॉस कसा करायचा असा प्रश्न हत्तींना पडला.
पण काही जिंदादिल माणसांनी हत्तींना रस्ता क्रॉस करायचा आहे ओळखून वाहतूक रोखली. काही व्यक्तींनी आपल्या गाड्यात एका विशिष्ट अंतरावर थांबवून ठेवल्या. गाड्यांची वर्दळ थांबली आहे, हे पाहून हत्तीही बाहेर आले आणि क्षणार्धात त्यांनीही रस्ता क्रॉस केला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे यावेळी रस्त्या क्रॉस करण्यासाठी त्यांना मदत केलेल्या इसमाचे हत्तीचे आभारही मानलेत. हा व्हिडीओ आधी टिकटॉकवर शेअर करण्यात आला होता. त्यानंतर आता पुन्हा हा व्हिडीओ ट्विटरवरुनही पुन्हा शेअर करण्यात आला आहे.
हत्तीच्या थॅक्यूची भुरळ
25 सेकंदांच्या या व्हिडीओमध्ये हत्तींचा कळप रस्ता ओलांडताना दिसतो. या व्हिडीओ जर तुम्ही 16 ते 19 सेकंदांला बारकाईनं पाहिलंत, तर तुमच्या लक्षात येईल, की हत्तींच्या या कळपामधील एका हत्तीनं रस्त्यावरील वाहतूक रोखून धरणाऱ्याचे आभार मानलेत. 19 डिसेंबरला हा व्हिडीओ अपलोड करण्यात आला आहे. अवघ्या काही दिवसांच्या आत 78 लाखापेक्षा जास्त जणांनी हा व्हिडीओ पाहिला असून अनेकांना या व्हिडीओनं भुरळ पाडली आहे.
पाहा व्हिडीओ –
He gives thanks after crossing the road aweee ??pic.twitter.com/61zHq1fwOA
— Figen (@TheFigen) December 19, 2021
इतर महत्त्वाच्या बातम्या –
Omicron in Maharashtra : ओमिक्रॉनचा धोका, राज्यात नवी नियमावली जाहीर, काय आहेत नवे निर्बंध?
Pune crime | सोसायटीतील निवडणुकीवरून एकास लोखंडी जाळीने गंभीर मारहाण
अधिवेशनाआधी कोरोना टेस्ट होणारच आहे, मग सगळे जवळ जवळ बसू- Ajit Pawar