Extramarital Affair | ‘हो माझ्या आईचे विवाहबाह्य संबंध व्हावेत हीच माझी इच्छा’, अखेर एक मुलगी असं का बोलली?
Extramarital Affair | आज आंतरराष्ट्रीय महिला दिन आहे. या निमित्ताने एका मुलीने आपल्या आईच्या विवाहबाह्य प्रेमसंबंधाची इच्छा व्यक्त केली. तिने एक मोठी पोस्ट लिहून तिला काय वाटत ते सांगितलय. येणाऱ्या मदर्स डे ला हेच माझ्याकडून तिला गिफ्ट असेल असं या मुलीने लिहिलय. पण ही मुलगी असं का बोलतेय? काय यामागे कारण आहे?
नवी दिल्ली : आपल्या आईच घर मोडावं, अशी कुठल्याही मुलीची इच्छा नसते. पण एका मुलीनेच आपल्या आईचे परपुरुषासोबत प्रेमसंबंध जुळवायचे हे ठरवलं असेल तर?. आज आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने एका मुलीने सोशल मीडियाच्या माध्यमातून अशी विचित्र इच्छा व्यक्त केली. त्यावरुन लोकांनी या मुलीला ट्रोल केलं. पण असं घडलं काय आहे की, एका मुलगीच आपल्या आईच्या आयुष्यात परपुरुष यावा, अशी इच्छा व्यक्त करतेय.
मुलीने Reddit च्या r/marriageadvice ग्रुपवर एक मोठी पोस्ट शेअर केलीय. “माझी आई दु:खी आहे. तिचं अफेअर व्हाव अशी माझी इच्छा आहे. येणाऱ्या मदर्स डे ला हेच माझ्याकडून तिला गिफ्ट असेल” माझी आई वैवाहिक आयुष्यात खूश नाहीय. याचं कारण माझे वडिल आहेत, असं या मुलीने लिहिलय. या मुलीची आई 52 वर्षांची आहे.
मुलीचं म्हणण काय?
“दोघे खूप मुश्किलीने परस्पराशी बोलतात. आई दरदिवशी खूप प्रेमाने त्यांच्यासाठी जेवण बनवते. पण ते जेवत सुद्धा नाहीत. कधी मनापासून त्यांनी आभार सुद्धा मानले नाहीत. वडिलांच्या मनात अजिबात प्रेम नाहीय” असं या मुलीने लिहिलय. “माझे वडिल शेवटचं कधी माझ्या आईला डिनर डेटसाठी घेऊन गेले होते, हे मला आठवतही नाहीय. दोघे आता ऐकमेकांची अजितबात काळजी घेत नाहीत. आधी असं नव्हतं, दोघांमध्ये परस्परांबद्दल प्रेम, आदर होता” असं या मुलीने लिहिलय.
अफेयर जुळवणाऱ्या डेटिंग वेबासाइट्सची मेंबरशिप
पोस्टनुसार, महिलेच आपल्या 53 वर्षीय नवऱ्यावर अजूनही प्रेम आहे. सोडण्याचा विचारही तिच्या मनात नाहीय. पण मुलीच्या मते तिचे वडिल आणि लग्न आईवर ओझ्यासारख आहे. त्यामुळे ती आपल्या आईला अफेयर जुळवणाऱ्या डेटिंग वेबासाइट्सची मेंबरशिप मिळवून देण्याचा विचार करत आहे.
‘आईला नाही, तुला मदतीची गरज आहे’
अनेकांना मुलीचा हा विचार पटला नाही. त्यांनी मुलीचीच शाळा घेतली. अशा विवाहबाह्य प्रेम प्रकरणामुळे कोणाचा कधीच फायदा होत नाही. यामुळे तुमचा संसार उद्धवस्त होतो. तुझ्या आईच्या मनात असं काही असतं, तर तिने केव्हाच केलं असतं, असं एका युजरने म्हटलय. दुसऱ्याने लिहिलय की, “आईला नाही, तुला मदतीची गरज आहे. तुटणार नातं वाचवण्याऐवजी अजून मोडण्याच्या मागे लागली आहे”