Video | ऑनलाईन शॉपिंगचा काळाबाजार, ग्राहकांपर्यंत पोहोचण्याआधीच वस्तूंचं हे काय होतंय ? व्हिडीओ व्हायरल
सध्या एक वेगळाच व्हिडीओ व्हायरल होत आहे. काही लोक ऑनलाईन पद्धतीने ऑर्ड केलेले सामान ग्राहकाकडे न देता त्याआधीच उघडून पाहत आहेत. तसा एक व्हिडीओ व्हायरल होत असून ग्राहकांना बनावट वस्तू दिल्या जात असल्याची चर्चा नेटकरी करत आहेत.
मुंबई : आजकाल सगळे व्यवहार डिजिटल पद्धतीने होत आहेत. ऑनालाईन ऑर्डर करुन वेगवेगळ्या वस्तू मागवण्याचा प्रमाण वाढले आहे. या ऑनलाईन शॉपिंगचे फॅड सध्या गावकुसापर्यंत जाऊन पोहोचले आहे. सध्या वेगवेगळ्या ऑनलाईन शॉपिंग कंपन्यांनी फेस्टिव्हल सेलच्या माध्यामातून आकर्षक अशी सूट दिलेली आहे. मात्र, या सर्व धामधुमीममध्ये एक वेगळाच व्हिडीओ व्हायरल होत आहे. काही लोक ऑनलाईन पद्धतीने ऑर्ड केलेले सामान ग्राहकाकडे न देता त्याआधीच उघडून पाहत आहेत. तसा एक व्हिडीओ व्हायरल होत असून ग्राहकांना बनावट वस्तू दिल्या जात असल्याची चर्चा नेटकरी करत आहेत.
माणसे वस्तू उघडून पाहत आहेत
हा व्हिडीओ नेमका कुठला आहे, याची माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, सध्याचा व्हायरल होत असलेला व्हिडीओ ऑनालाईन शॉपिंग करणाऱ्यांना चकित करुन सोडणारा आहे. हा व्हिडीओ जवळपास एका मिनिटाचा आहे. तसेच या व्हिडीओमध्ये दोन माणसे दिसत आहेत. ही माणसे एका कंपनीमार्फत ऑनालाईन पद्धतीने दिल्या जाणाऱ्या वस्तू आधीच उघडून पाहत आहेत. प्राथमिक अंदाजानुसार हे माणसे सामानाची डिलिव्हरी करणारे असावेत. त्यांनी सामानाची ने-आण करणारी गाडी मध्येच थांबवली आहे. त्यांच्या आजूबाजूला कोणीही नाही.
व्हिडीओतील माणसू म्हणतोय, आम्ही वस्तू तपासत आहोत
गाडी मध्येच थांबवून ही माणसे ग्राहकांना देण्यासाठी पॅक केलेले सामान खोलत आहेत. हा व्हिडीओ रेकॉर्ड केल्यानंतर त्यातील एक माणूस उडवाउडवीची उत्तरं देत आहे. पॅक केलेल्या वस्तू पुन्हा का उघडल्या जात आहे ? असे विचारताच आम्ही त्यातील वस्तू तपासत आहोत. त्या वस्तू व्यवस्थित आहेत की नाही ते आम्ही चेक करत आहोत, असे उत्तर माणसाने दिले आहे.
प्रश्न विचारताच माणूस बुचकाळ्यात पडला
विशेष म्हणजे ग्राहकांपर्यंत पोहोचवल्या जाणाऱ्या वस्तू एका कव्हरमध्ये जिकडेतिकडे पसरलेल्या दिसत आहे. यातील दुसऱ्या माणसाकडे कॅमेरा करताच त्याने आपला चेहरा लपवला आहे. कोणती वस्तू आहे, कशी आहे, किंमत किती आहे, हे सगळं दिलेलं असताना त्याला पुन्हा उघडून का पाहिले जात आहे ? असे विचारताच समोरचा माणूस बुचकाळ्यात पडला आहे.
पाहा व्हिडीओ :
ऑनालाईन शॉपिंग करताना सावधान ! #onlineshopping | #ShoppingOnline | #shopping | @TV9Marathi pic.twitter.com/AuM7eqZzvH
— prajwal dhage (@prajwaldhage100) October 9, 2021
व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
दरम्यान हा व्हिडीओ नेमका कुठला आहे, याची माहिती मिळू शकलेली नाही. तसेच या व्हिडीओमध्ये दिसणारी दोन माणसे नेमकं काय करत आहेत ? हे समजू शकलेले नाही. हा व्हिडीओ फक्त एका मिनिटाचा असल्यामुळे माणसे नेमकं काय करतायत ते निश्चितपणे सांगता येत नाही. सध्या हा व्हिडीओ फेसबुक व्हॉट्सअॅप तसेच ट्विटरसारख्या माध्यमांवर व्हायरल होत आहे.
(या व्हिडीओबद्दल अधिक माहिती उपलब्ध नाही. व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या दृशांच्या आधारावर वृत्तांकन करण्यात आले आहे. व्हिडीओच्या सत्यतेची जबाबदारी TV9 मराठी घेत नाही.)
इतर बातम्या :
Video: एक टमटम, 4 पोलीस आणि पाणी साचलेला रस्ता, यूपी पोलिसांच्या नावाने व्हिडीओ व्हायरल
Video: नवरीच्या भावाने नवरा-नवरीला सोबत उचललं, आणि जमिनीवर फेकलं, अनोख्या प्रथेचा व्हिडीओ व्हायरल
(online shopping frauds in india two men opening packet delivery items see viral video)