Viral: दैवाने दिलं आणि कर्मानं नेलं..फक्त दोन रपये कमी पडले..नाहीतर 19 वर्षांची तरुणी असती 1734 कोटींची मालकीण
याच दरम्यान एके दिवशी रेचेलला समजले की तिलवा 182 दशलक्ष पाऊंड म्हणजे 1734 कोटींहून अधिक रकमेची लॉटरी लागलेली आहे. हे ऐकल्यावर तिच्या पायाखालची वाळूच सरकली आणि ती एकनद आनंदी झाली. आपला पार्टनर लियाम आणि आईसोबत ती ऊज्ज्वल भविष्याची आणि खरेदीची स्वप्ने पाहू लागली.
नवी दिल्ली: एका 19 वर्षांच्या तरुणीला दैव देतं आणि कर्म नेतं हा अनुभव आलाय. या तरुणीला ती रातोरात करोडपती (Crorepati) झाल्याची माहिती मिळाली. साधीसुधी नाही तर इनाम मिळाल्यानं ती 1734 कोटी रुपयांची मालकीण (Owner) झाल्याचं तिला समजलं. पण तिच्या या आनंदाचं (Happiness) रुपांतर काही काळातच दु:खात झालं. जर तुम्हाला कुणी सांगितलं की एका झटक्यात तुम्ही कोट्यवधींचे मालक झाला आहात, तर तुम्हाला काय वाटेल. तर तुमचा आनंद नक्कीच गगनात मावेनासा होईल. असंच काहीचं या 19 वर्षांच्या मुलीसोबत झालं. रात्रीतून ती कोट्यधीश झाल्याचं तिला समजलं. 1734 रुपयांचं बक्षीस तिनं जिंकल्याचं ऐकल्यानंतर, तिच्या आनंदाला पारावार राहिला नाही..पण हा आनंद काही काळच टिकू शकला.
दैवानं दिलं
द सन या वृत्तसंस्थेच्या वृत्तनुसार, इंग्लंडमध्ये राहणारी रेचेल केनेडी नावाची तरुणी आपल्य़ा 21 वर्ष वयाचा पार्टनर असलेल्या लियाम मैकक्रोहन याच्यासोबत काही आठवड्यांपासून युरोमिलियन्सचे लॉटरीचे तिकिट खरेदी करीत होती. मात्र त्यांना बक्षीस मिळत नव्हते. रेचेल आणि लियान हे दोघेही एकच सीरिजचे नंबर 6, 12, 22, 29, 33, 6 आणि 11 यावर डाव लावत होते. याच दरम्यान एके दिवशी रेचेलला समजले की तिलवा 182 दशलक्ष पाऊंड म्हणजे 1734 कोटींहून अधिक रकमेची लॉटरी लागलेली आहे. हे ऐकल्यावर तिच्या पायाखालची वाळूच सरकली आणि ती एकनद आनंदी झाली. आपला पार्टनर लियाम आणि आईसोबत ती ऊज्ज्वल भविष्याची आणि खरेदीची स्वप्ने पाहू लागली.
विश्वास बसत नव्हता
रेचेलला आपल्याला 182 दशलक्ष युरोची लॉटरी लागली आहे, यावर तिचा विश्वास बसत नव्हता. ते ज्या नंबरवर सारखे डाव लावत होते, ते नंबर युरोमिलियन्सच्या जॅकपॉटसाठी निवडण्यात आले होते. आता हे बक्षीस आपल्याला लागले आहे, याची खात्री करुन घेण्यासाठी जेव्हा रेचेलने युरोमिलियन्सच्या ऑफिसमध्ये फोन केला, तेव्हा तिथून मिळालेल्या उत्तराने तिचा भलामोठा आनंद एका क्षणात अतिव दु:खात परिवर्तित झाला.
कर्माने नेले
युरो मिलियन्सच्या ऑफिसातून सांगण्यात आले की, रेचेल यांनी ज्या नंबरावर डाव लावला होता, त्याला बक्षीस तर जाहीर झआले आहे, पण ती रक्कम रेचेल हिला मिळू शकणार नाही. कारण ज्या दिवशी तिने हे लॉटरी तिकीट खरेदी केले होते, त्यावेळी ते खरेदी करण्याइतपत रक्कम त्यादिवशी तिच्या खात्यात नव्हती. तिच्या खात्यात केवळ 238 रुपये होते आणि तिकिटाची किंमत 240 रुपयांपासून सुरु होत होती. म्हणजे ज्या तिकिटाला बक्षीस जाहीर झाले होते ते तिकीट रेचेल खरेदीच करु शकलेली नव्हती.
फक्त दोन रुपये कमी पडले नाहीतर..
रेचेलच्या खात्यात त्यावेळी फक्त 2.50 युरोच होते. त्यामुळे ड्रॉपूर्वी तिकिट ऑटोमॅटिक खरेदी होऊ शकले नाही. इतरवेळी ती अशाच पद्धतीने तिकिटे खरेदी करीत होती. या गोँधळामुळे, अवघे दोन रुपये कमी पडल्याने ती 1734 कोटी रुपयांना मुकली. हा सगळा प्रकार फेब्रुवारीत घडला होता. मात्र रेचेलच्या पार्टनरने नुकतेच ट्विट करुन हे जाहीर केले. त्यामुळे हा मुद्दा पुन्हा एदा चर्चेत आला आहे.