नीट बघा, प्राणी दिसतोय का यात?
जंगलातील झाडांचा आणि पानांचा रंग इतका सारखा असतो की आत बसलेले प्राणी सहज दिसत नाहीत. असाच एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून लोकांना तो प्राणी दिलेल्या वेळेत सापडत नाही.
मुंबई: असे काही फोटो आहेत जे आपल्या डोळ्यांना फसवतात. चांगला मेंदू असलेले लोक दिलेल्या वेळात योग्य वस्तू शोधण्यात नेहमीच यशस्वी होतात आणि काही लोक या सगळ्याला एक कला मानतात पण या सगळ्याला सोशल मीडियावर ऑप्टिकल भ्रम म्हणून ओळखले जाते. काही लोकांचे डोळे इतके तीक्ष्ण असतात की ते काही सेकंदात बारकावे पकडतात. जंगलातील झाडांचा आणि पानांचा रंग इतका सारखा असतो की आत बसलेले प्राणी सहज दिसत नाहीत. असाच एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून लोकांना तो प्राणी दिलेल्या वेळेत सापडत नाही.
इंटरनेटवर व्हायरल होणाऱ्या फोटोमध्ये आपल्याला इथे कोणता प्राणी आहे हे शोधावे लागेल. ऑप्टिकल भ्रम सोडवणे हे सगळ्यांनाच जमत नाही. हे चित्र नीट बघा आणि यात एक प्राणी लपलाय तो शोधून दाखवा.हा प्राणी साप आणि पालीसारखा आहे. सरपटणारा! तुम्ही जर चित्र नीट पाहिलंत तर तुम्हाला तो नक्कीच दिसेल. हा शोधण्यासाठी आपल्याकडे फक्त 7 सेकंद आहेत. दिलेल्या वेळात जर तुम्ही याचं उत्तर देऊ शकलात तर तुम्ही खरंच स्मार्ट आहात! हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
अवघ्या 7 सेकंदात शोधण्याचे आव्हान
रोज सराव करणारे लोक हा ऑप्टिकल भ्रम बघताना तत्पर असतात. रोजच्या सरावामुळे त्यांना माहित असतं कोणती वस्तू/ प्राणी कुठे असू शकते. निरीक्षण कौशल्यच काय तर हा एकप्रकारचा सरावाचा देखील भाग आहे. चित्रात कोरडी पाने पडलेली आहेत आणि त्यात एक प्राणी लपलेला आहे. हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. चित्राच्या मध्यभागी किंचित उजव्या बाजूला हा प्राणी दिसेल. काळ्या डोक्यासह तपकिरी रंगाचा हा सरपटणारा प्राणी आहे. हा एक ऑस्ट्रेलियन सरडा आहे. पायगोपस लेपिडोपोडस असे या सरड्याचे शास्त्रीय नाव आहे.