Optical Illusion: या मेंढीच्या कळपात एकाने घुसखोरी केलीये, बघा दिसतोय का?
प्लेबझने तयार केलेल्या या ऑप्टिकल भ्रमात तपकिरी चेहऱ्याच्या डझनभर पांढऱ्या मेंढ्या आपल्याला या चित्रात दिसतायत.

सोशल मीडियाचे ‘विश्व’ आजकाल ऑप्टिकल इल्यूजन चित्रांनी फुलून गेले आहे. खरं तर अशा चित्रांमध्ये एक कोडं किंवा गोष्ट दडलेली असते, जिचं गूढ इंटरनेट वापरणाऱ्यांना सोडवण्यात खूप मजा येते. आतापर्यंत मेंदूला भिडणारे अनेक ऑप्टिकल इल्युजन तुम्ही पाहिले असतील. पण आता जे कार्टून आलंय, त्यात दिलेला टास्क सोडवण्यासाठी लोकांना घाम फुटला आहे. चित्रात मेंढ्यांच्या कळपात एक घुसखोर आहे, त्याला शोधून काढायला सांगितले जात आहे.
अशा चित्रांचे गूढ उकलणाऱ्यांचे मेंदू तर शार्प असतातच, शिवाय त्यांचा बुद्ध्यांकही अधिक असतो, असे संशोधन सांगते. काही चित्रांतून तुमचं दडलेलं व्यक्तिमत्त्वही प्रकट होतं. याशिवाय छोट्या-छोट्या गोष्टी पाहण्याकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोनही या चित्रांमधून तपासला जातो.

find the odd man out
प्लेबझने तयार केलेल्या या ऑप्टिकल भ्रमात तपकिरी चेहऱ्याच्या डझनभर पांढऱ्या मेंढ्या आपल्याला या चित्रात दिसतायत. पण त्यांच्या मध्येच कुठेतरी एक बकराही लपून बसलेला आहे. आव्हान हे आहे की आपल्याला ते १५ सेकंदाच्या आत शोधावे लागेल.
चित्राची रचना करणाऱ्या कलाकाराने शेळी मेंढ्यांमध्ये इतक्या हुशारीने लपवून ठेवली आहे की, ती सापडणे सर्वांनाच शक्य होत नाही. मेंढ्या आणि बकरीचे स्वरूपही जवळजवळ सारखेच असल्याने. हेच कारण आहे की लोक प्रत्येक वेळी जेव्हा त्याला शोधतात तेव्हा त्यांना तो बकरा शोधणं कठीण जातं.
बहुधा तुम्ही हे उत्तर शोधून काढले असेल. ज्या लोकांनी बकरा पाहिला नसेल, त्यांना काळजी करण्याची गरज नाही. तुमच्यासाठी, आम्ही तुम्हाला तो कुठे आहे हे खालील चित्रात लाल वर्तुळामध्ये सांगत आहोत.

here is the answer