सांताक्लॉज हरवलाय! द्या शोधून
आज आम्ही तुमच्यासाठी डोळ्यांना फसवणारा ऑप्टिकल इल्यूजन घेऊन आलो आहोत.
जगात सर्वाधिक मेंदू कुणाकडे असतील तर तो माणूसच आहे. मानवी मेंदू हा जगातील सर्वात शक्तिशाली संगणक मानला जातो. मानवी मेंदू हवा ते करू शकतो, इतकी शक्ती त्याच्यात असते, असं म्हणतात. त्यामुळेच लहानपणापासूनच मुलांना कोडी सोडवण्याची सवय लावली जाते. ऑप्टिकल इल्युजनचाही यात समावेश आहे. ऑप्टिकल भ्रमाला ऑप्टिकल इल्यूजन असेही म्हणतात. आज आम्ही तुमच्यासाठी डोळ्यांना फसवणारा ऑप्टिकल इल्यूजन घेऊन आलो आहोत.
आम्ही आणलेला ऑप्टिकल भ्रम हा खूप गोंधळात टाकणारा आहे. या चित्रात ख्रिसमस ट्रीच्या आत कुठेतरी एक सांताक्लॉज बसलेला आहे, तो शोधण्याचं आव्हान आहे, पण हो, अवघ्या 11 सेकंदात तो सांता शोधावा लागेल, तरच तुमचा मेंदू तल्लख आहे असं गृहीत धरलं जाईल.
चित्रात आपण पाहू शकता की, काही मुले एका खोलीत उपस्थित आहेत, त्यातील काही जण खोली सजवत आहेत, काही भेटवस्तू पॅक करत आहेत, तर काही मुले मजा करत आहेत. या खोलीत त्या मुलांमध्ये ख्रिसमस ट्रीही आहे. याच ख्रिसमस ट्री मध्ये कुठेतरी, तो सांताक्लॉज हजर आहे.
ख्रिसमस ट्रीकडे नीट निरखून पाहिलंत तर त्यात दडलेला सांताक्लॉज तुम्हाला दिसेल याची आम्हाला खात्री आहे, पण जर तुम्हाला ते दिसलं नाही तर आम्ही तुम्हाला त्याचं उत्तर सांगतो. सांता खरंतर ख्रिसमस ट्रीच्या अगदी खाली दोन चेंडूंच्या मध्यभागी आहे, त्याने चष्मा लावलेला आहे आणि एक मोठी दाढी सुद्धा आहे.